Nirbhaya Mother on Kolkata Rape and Murder Case: 'परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा'; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा कसून तपास करण्याऐवजी आंदोलनातून त्या जनतेचे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आशा देवी म्हणाल्या आहेत.

Photo Credit- X

Kolkata Rape Murder Case: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात(Kolkata Rape Murder Case) आली. या घटनेवर देशभरातील डॉक्टर्स संपावर गेले आहेत. मात्र, तरीही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. अशातच निर्भयाच्या आईची(Nirbhaya Mother ) संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी ममता बॅनर्जी या आंदोलनात सहभगी झाल्या होत्या आहे. त्याला लक्ष करत निर्भयाच्या आईंनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आंदोलनातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जनतेची दिशाभूल करत आहेत. क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा कसून तपास करण्याऐवजी आंदोलनातून त्या जनतेचे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत', असे आशा देवी म्हणाल्या आहेत. (हेही वाचा: Kolkata Rape Murder Case: कोलकता बलात्कार प्रकरणानंतर रुग्णालयात पुरावे नष्ट! भाजप नेते जफर यांनी ममता सरकारवर केला गंभीर आरोप) 

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित निर्भयाच्या आईने कोलकात्याच्या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. 'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा', असेही त्यांनी म्हटलं आहे. 'ममता बॅनर्जी या आपल्या पदाचा गैरवापर करत आहे आणि घटनेतील दोषींवर कारवाई करण्याऐवजी या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे', असा आरोप निर्भयाच्या आई आशा देवी यांनी केला.  (हेही वाचा:West Bengal: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तरूणीवर बलात्कार आणि हत्येच्या अफवांना उधाण; पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा)

'कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये मुली सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यासोबत रानटी घटना घडतात, तेव्हा देशात महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती आहे, हे समजू शकते. ममता बॅनर्जी या राज्य सरकारच्या प्रमुख आहेत. माणुसकीला लाजवेल अशी घटना त्यांच्या राज्यात घडते, ज्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो, त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. ममता यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दोषींवर कारवाई करण्यासाठी आपली शक्ती वापरण्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलने करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत', असे आशा देवी यांनी म्हटलं.