गुजरात: सुरतमध्ये कोचिंग क्लास इमारतीला भीषण आग; 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू; 30 जण अडकल्याची भीती

गुजरात मधील सुरत येथे सरथाना परिसरात असलेल्या तक्षशीला इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली आहे.

12 people including students died in fire in Surat (Photo Credits: Twitter)

गुजरात (Gujarat) मधील सुरत (Surat) येथे सरथाणा परिसरात असलेल्या तक्षशीला इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली आहे. या आगीमुळे इमारतीत तब्बल 40 जण अडकले आहेत, तर 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 18 गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. तसेच, अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तक्षशीला ही कमर्शियल इमारत आहे, इथे चालू असलेल्या कोचिंग क्लासमध्ये ही आग लागली. आग इतकी भयानक होती की, काही विद्यार्थ्यांनी घाबरुन इमारतीच्या मजल्यावरुन उड्या मारल्या.

आतापर्यंत या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 लोकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातानंतर ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी गुजरात सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना यातील पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif