Lok Sabha Election Results 2024: महुआ मोईत्रा यांची कृष्णनगरमधून 35 हजारांहून अधिक मतांनी आघाडी; भाजपच्या उमेदवार अमृता रॉय पिछाडीवर

कृष्णानगर मतदारसंघात सात विधानसभा जागांचा समावेश होतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णनगर जागेवरून तब्बल 11 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 13 मे 2024 रोजी चौथ्या टप्प्यात मतदान झाले.

Mahua Moitra (PC - ANI)

Lok Sabha Election Results 2024: पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदारसंघातून (Krishnanagar Constituency) पुन्हा निवडणूक लढवत असलेल्या तृणमूलच्या उमेदवार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) या भाजप उमेदवार अमृता रॉय यांच्या विरोधात आघाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मते, मोईत्रा 7,275 मतांनी आघाडीवर आहेत. कृष्णानगर जागेवरून लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या महुआ मोईत्रा यांना सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजपच्या अमृता रॉय यांच्या 59,290 मतांच्या विरोधात आतापर्यंत 66,565 मते मिळाली आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, मोइत्रा यांनी 6,14,872 मतांसह त्यांच्या पक्षासाठी विजय मिळवला होता. कृष्णानगर मतदारसंघात सात विधानसभा जागांचा समावेश होतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णनगर जागेवरून तब्बल 11 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 13 मे 2024 रोजी चौथ्या टप्प्यात मतदान झाले. (हेही वाचा - Lok Sabha Election Results 2024 Live Updates: NDA देशामध्ये 300 जागांवर आघाडीवर तर INDIA Alliance कडे 225 जागांवर आघाडी  )

काही दिवसांपूर्वी महुआ मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. लोकसभा पोर्टलवर महुआ मोइत्राचे लॉगिन दुबई आणि देशातील इतर ठिकाणांहून लॉग इन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी संसदेत प्रायोजित प्रश्न विचारल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे एकप्रकारे त्याला संसदेची अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन्ही गोष्टींशी जोडून त्यांच्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला होता.