Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात २०२५ मध्ये भाविकांची संख्या वाढत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा समजल्या जाणाऱ्या या कुंभमेळ्यात आतापर्यंत २७ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले आहे. ३० जानेवारीपर्यंत ५५ लाखांहून अधिक लोकांनी गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नान केले होते. मात्र, २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या दुर्दैवी घटनेत ३० भाविकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी कडक पावले उचलली. आता बसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर ३ फेब्रुवारी ला होणाऱ्या तिसऱ्या अमृतस्नानाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बसंत पंचमीला अमृत स्नानासाठी शुभ मुहूर्त
माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला बसंत पंचमीचा सण साजरा केला जातो. यावर्षी पंचमीची तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी सुरु होईल आणि 3 फेब्रुवारी ला सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी संपेल.
अमृत स्नानाचा ब्रह्म मुहूर्त
दिनांक : ३ फेब्रुवारी २०२५
वेळ : सकाळी ५.२३ ते ६.१६ वाजेपर्यंत
बसंती पंचमीवर अमृत स्नानाचे धार्मिक महत्त्व
बसंती पंचमीला ज्ञान आणि विद्या यांच्या देवी मां सरस्वतीचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी पवित्र स्नान केल्याने गुरु ज्ञान आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात. मन आणि आत्मा शुद्ध होतात. पापांचा नाश आणि मोक्ष प्राप्तीची मान्यता आहे. जीवनात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता येते.
2025 मध्ये महाकुंभासाठी स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा
तिसरे अमृत स्नान : 3 फरवरी- बसंत पंचमी
चौथा अमृत स्नान : 12 फरवरी- माघी पौर्णिमा
पाचवे अमृत स्नान : २६ फेब्रुवारी - महाशिवरात्री
सुरक्षा आणि प्रशासनाच्या तयार
सुरक्षा आणि प्रशासनाच्या तयारीत प्रयागराजमध्ये 10,000 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत, ज्यामध्ये स्थानिक पोलीस आणि अर्धसैनिक बलांचा समावेश आहे. संगम क्षेत्रात ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे कडक देखरेख केली जात आहे. स्नानाच्या काळात VIP हालचालींवर पूर्णपणे बंदी आहे. तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष बॅरिकेडिंग आणि मार्गदर्शन पथके तैनात आहेत.