Madhya Pradesh News: तरुणीवर लैंगिक अत्याचार करूण बेदम मारहाण, आरोपीच्या घरावर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

मध्य प्रदेशमध्ये तरूणीसोबत झालेल्या छळाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला आहे.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) गुना येथे तरुणीवर अत्याचाराची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या घटनेत आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्या दोन्ही डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली तर दुसऱ्या डोळ्याची दृष्यमानता कमी झाली आहे. आता या प्रकरणातील आरोपीविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. प्रशासनाने थेट आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. (हेही वाचा :Dombivali Crime: डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार )

तरुणीवर सध्या ग्वोल्हेर येथे उपचार सुरू आहेत. अयान पठाण असे आरोपीचे नाव आहे. त्याला तरूणीचे घर त्याच्या नावावर करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याने तरूणीला महिनाभर ओलीस ठेवले होते.

पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये तरुणीने सांगितले की, ' त्याने तिला मारहाण केली आहे. ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. यात त्याने तिच्या डोळ्यावर दगडाणे मारहाण केली. महिनाभर तिच्यावर अत्याचार केले. या दरम्यान, ती ओरडू नये म्हणून आरोपीने तिच्या ओठांवर फेविकॉल लावले होते. त्याशिवाय, तिच्या जखमांवर मिरची पावडर लावली होती. आरोपीविरोधात गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी त्याच्या फाशीची शिक्षा मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने कारवाई पूर्वी नोटीसही दिली होती. त्यानंतर आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.