Lok Sabha Election 2024 Phase 6: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; 58 मतदारसंघात 25 मे रोजी मतदान

बिहार, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.

Election | (Representational Image)

Lok Sabha Election 2024 Phase 6: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदानाच्या (Lok Sabha Election 2024 Phase 6) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर निवडणुका होत आहे. त्याशिवाय, बिहार (8 जागा), हरियाणा (सर्व 10 जागा), जम्मू आणि काश्मीर (एक जागा), झारखंड (4 जागा), ओडिशा (6 जागा), उत्तर प्रदेश (14 जागा) आणि पश्चिम बंगाल (8 जागा) यांचा समावेश आहे. दिल्लीत आज भाजप, काँग्रेस, आप या सर्वच पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. मतदान 25 मे रोजी सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.(हेही वाचा:Dry Day in Mumbai on June 4: लोकसभा निकालाच्या दिवशी 'ड्राय डे' ला विरोध; हॉटेल असोसिएशनची न्यायालयात धाव)

काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभा आणि रोड शो होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज दिल्लीत आज रोड शो करणार आहेत आणि कॉर्नर सभा घेणार आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी, दिल्ली, फरिदाबाद आणि गुरगावमधील सर्व दारूची दुकाने 23 मे रोजी संध्याकाळी बंद होतील.  25 मे रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती बंद राहतील. शिवाय, लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाच्या दिवशी, 4 जून रोजी या शहरांमध्ये मद्य विक्रीला बंदी राहील.