Lockdown in Delhi: दिल्लीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला; कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना मिळणार 1 कोटी रुपयांची भरपाई

दिल्ली हळूहळू अनलॉक होईल. एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्तीमुळे कोरोनाची लाट कमकुवत होत आहे. आता आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

प्रतिकात्मक फोटो (Photo: PTI)

Lockdown in Delhi: प्राणघातक कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव देशात अजूनही सुरू आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये आणखी एका आठवड्याची वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 31 मे पर्यंत लॉकडाऊन राहील. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत स्वत: यासंदर्भात घोषणा केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यास आम्ही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करू, असंही केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

यासंदर्भात आणखी बोलताना केजरीवाल म्हणाले की, जर पुढील आठवडाभर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तर, 31 मेपासून आम्ही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू करू. आज कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत संसर्ग दरही 2.5% टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 1,600 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. (वाचा - Medical Robot: पटना येथील इंजिनियरींगच्या विद्यार्थीनीने तयार केला रोबोट; कोरोना रुग्णांच्या सेवेत करणार डॉक्टरांची मदत)

केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे की, आपण दिल्लीत सर्व काही सुरू करणार नाही. दिल्ली हळूहळू अनलॉक होईल. एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्तीमुळे कोरोनाची लाट कमकुवत होत आहे. आता आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांची एक कोटी भरपाई

कोरोना रुग्णांची सेवा करताना अनेक डॉक्टरांचा जीव गेला. अनेक डॉक्टर आणि परिचारिकांनी 24 तास काम केले. आम्ही त्यांचे रुणी आहोत. त्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.