![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/10/rape.jpg?width=380&height=214)
Kerala Shocker: देशात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना जास्तच समोर येत आहेत. अशातच कुटुंबातील सदस्यांनी अत्याचार केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनी अनेकवेळा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आई घरी नसताना आरोपीने मुलीवर अनेक वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक कृत्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. कुलथुपुझा पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका दिवसापूर्वी मुलीने तिच्या शाळेत 'समुपदेशन' सत्रादरम्यान हा घडलेला प्रकार सांगितला आहे. हेही वाचा: HIV Medicines: एचआयव्हीची औषधे बंद केल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या
शाळेने पोलिसांना माहिती दिली आणि त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींविरोधात पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.