Kerala Nipah Virus: केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढला, ऑस्ट्रेलियातून मागवले अँटीबॉडीचे डोस

कर्नाटक सरकारने लोकांना प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे.

Nipah Virus | (Photo credit: archived, edited, representative image)

केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरसचा (Nipah Virus) धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. केरळमध्ये आत्तापर्यंत निपाहचे सहा रुग्ण समोर आले आहेत. विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून ऑस्ट्रेलियाकडून (Australia) मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे डोस मागवण्यात आले आहेत.  केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आणखी एका 39 वर्षीय पुरुषाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. केरळमधील हा सहावा रुग्ण आहे. तर आत्तापर्यंत दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.  (हेही वाचा - Kerala Nipah Virus Scare: कोविड-19 च्या तुलनेत निपाह व्हायरसचा मृत्यूदर 70% अधिक, ICMR ची माहिती)

कोविडच्या तुलनेत निपाह संक्रमित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून ते 40 ते 70 टक्के दरम्यान असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. जे आगोदर जे 2-3 टक्के इतके होते. आयसीएमआरने माहिती देताना पुढे म्हटले आहे की, त्यांना ऑस्ट्रेलियाकडून सन 20189 मध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीचे काही डोस मिळाले आहेत. सध्या हे डोस फक्त 10 रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर, भारताबाहेर निपाह विषाणूची लागण झालेल्या 14 रुग्णांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देण्यात आली आहे. अँटीबॉडी देण्यात आलेले ते सर्वजण सुरक्षीत आहेत.

केरळमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे, कर्नाटक सरकारनेही आपली दक्षता वाढवली आहे. कर्नाटक सरकारने लोकांना प्रभावित जिल्ह्यांमध्ये प्रवास टाळण्यास सांगितले आहे. याशिवाय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तापावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif