Jammu and Kashmir: ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गमावलेल्या तरुणाची चिनाब नदीत उडी मारून आत्महत्या; पाकिस्तानात आढळला मृतदेह
त्यानंतर निराशेमध्ये त्याने चिनाब नदीत उडी मारून जीवन संपवले. त्याचा मृतदेह पाकिस्तानात आढळला आहे. तरुणाच्या मृतदेहाचे अवशेष परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी पिएमओ कार्यालयाकडे मदत मागितली आहे.
Jammu and Kashmir: जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात चिनाब नदीत उडी मारून जीवन संपवलेल्या तरुणाचा मृतदेह पाकिस्तानमध्ये सापडला आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधानांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरश नागोत्रा असे तरुणचे नाव असून 11 जून रोजी तो बेपत्ता झाला होता. तरुणाची मोटारसायकल अखनूरमध्ये चिनाब नदीच्या काठावर सापडली. कुटुंबीयांनी संबंधित पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली असून प्राथमिक तपासात तरुणाने नदीत उडी मारून आपले जीवन संपवले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. (हेही वाचा:Mahadev Online Gaming App: बॉलिवूड हादरलं! संजय दत्त, मलायका अरोरा, सुनिल शेट्टी, कपील शर्मा यांच्याह अनेक सेलिब्रेटी ईडीच्या रडारवर, पाहा यादी )
बेपत्ता होण्यापूर्वी त्याने ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे 80,000 रुपये गमावले होते. हरश नागोत्रा याच्या मृत्यूची माहिती एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲप मेसेजद्वारे कुटुंबीयांना मिळाली. तरुणाचे वडील सुभाष यांनी सांगितले की, त्यांना एका पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून व्हॉट्सॲप मेसेज आला होता. तो अधिकारी पोस्टमार्टम विभागात काम करत असल्याचे त्याने सांगितले. 13 जून रोजी पाकिस्तानी पंजाबमधील सियालकोट भागातील एका कालव्यातून तरुणाचा मृतदेह सापडल्याचे कुटुंबीयांना समजले.
तरुणाच्या नातेवाईकांनी सांगितले की त्यांनी,'पीएमओ, परराष्ट्र मंत्रालय आणि एमएचएला पत्र लिहिले आहे. कुटुंबाने पंतप्रधानांना हस्तक्षेप करून तरुणाचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी भारतात परत आणण्याचे आवाहन केले आहे,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले.