Jammu and Kashmir: राजौरीमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, खेरी मोहरा लाठी गाव आणि दंथाल परिसरात सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली.
Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी (Jammu and Kashmir Encounter)जिल्ह्यातील बुधल येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी पहाटे चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, खेरी मोहरा लाठी गाव आणि दंथाल परिसरात सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान, लष्कराचा दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित झाला. या दरम्यान, खेरी मोहरा भागाजवळ दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाला त्या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. (हेही वाचा: Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; चकमकीत 3 दहशतवादी ठार)
अलिकडच्या काळात संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया होत असल्याचे दिसत आहे. सुरक्षा दलांमध्ये चकमकी होते आहेत. ज्यात अनेक दहशतवादी आणि त्यांचे कमांडर ठार झाले आहेत. सुरक्षा दलांचे जवानही जखमी झाले आहेत. सुरुवातीला पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांपुरते दहशतवादी मर्यादित होते. मात्र, त्यानंतर दहशतवादी कारवाया आता जम्मूच्या इतर भागात पसरत आहेत.
दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये पहाटे चकमक
विशेष म्हणजे हे दहशतवादी उच्च प्रशिक्षित आहेत. भारतीय सैन्याच्या वाहनांवर ग्रेनेड हल्ला करणे, चिलखत छेदणाऱ्या गोळ्या तसेच M4 असॉल्ट रायफल वापरत आहेत. वाढता दहशतवाद आणि दहशतवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रांचा वापर धोकादायक ठरते आहे. विश्लेषकाच्या मते, जम्मूमधील वाढत्या दहशतवादाला तोंड देण्यासाठी एक व्यापक रणनीती आवश्यक आहे. ज्यामध्ये गुप्तचर माहिती गोळा करणे आणि सुरक्षा दलांमध्ये चांगला समन्वय राखणे महत्त्वाचे आहे.