Jammu-Kashmir Update: जम्मू-काश्मीरमध्ये अद्याप दहशतवाद्यांच्या कुरघोडी सुरूच, श्रीनगरमधील पोलिसावर गोळीबार, प्रकृती स्थिर

त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) सांगितले.

Firing | (Photo Credits: Pixabay)

श्रीनगरमध्ये (Srinagar) सोमवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसावर (Police) संशयित दहशतवाद्यांनी (Terrorists) हल्ला केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) सांगितले. स्थानिक मशिदीत नमाज पढून परतत असताना पोलीस निरीक्षक शेख फिरदौस या पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना श्रीनगरच्या बटमालू (Batmaloo) भागात घडली. बटामालूचे पोलीस निरीक्षक शेख फिरदौस नमाज पढून मशिदीतून परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. रुग्णालयात हलविले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.  श्रीनगरमधील हरिसिंह हाय स्ट्रीट परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले, त्यात चार जण जखमी झाले. जखमींमध्ये एक पोलिस कर्मचारी आणि दोन महिलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या एका गटावर ग्रेनेड फेकले, मात्र रस्त्याच्या कडेला ग्रेनेडचा स्फोट झाला. हेही वाचा Kashi Vishwanath Temple: पीएम नरेंद्र मोदींच्या आईच्या वजनाइतके सोने काशी विश्वनाथ मंदिराला दान; सुवर्णाने सजले गर्भगृह (See Video)

जखमींमध्ये मोहम्मद शफी, त्याची पत्नी तन्वीरा, दुसरी महिला असमत आणि पोलीस निरीक्षक तनवीर हुसेन यांचा समावेश आहे. खोऱ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवादी लक्ष्य करत आहेत. डिसेंबर 2021 मध्येही श्रीनगरच्या बाहेरील जेवानमध्ये दहशतवाद्यांनी पोलिस बसवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले, त्यापैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.