Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी 75 दहशतवाद्यांचा खात्मा; अतिरेकी मृतांच्या यादीत बारामुल्ला भाग अग्रस्थानी

या वर्षात आतापर्यंत दर पाचव्या दिवशी एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले आहे.

Jammu and Kashmir (img: tw)

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला, बांदीपोरा, कुपवाडा आणि कुलगाम जिल्ह्यात यावर्षी किती दहशतवादी मारले गेले याची यादी समोर (Terrorists in Jammu and Kashmir) आली आहे. बारामुल्ला हे अतिरेकी मृतांच्या यादीत अग्रस्थानी आहे. तिथे 9 चकमकीत 14 गैर-स्थानिक दहशतवादी मारले गेल्याचा आकडा समोर आला आहे. जानेवारी ते 29 डिसेंबर 2024 पर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादाविरुद्ध (Terrorist) महत्त्वपूर्ण कामगिरी केली. (हेही वाचा:Sopore Encounter: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक; दहशतवादी ठार, शोध मोहिम सुरू)

या वर्षात एकूण 75 दहशतवादी मारले गेले, त्यापैकी 60 टक्के पाकिस्तानी होते. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली. या वर्षात आतापर्यंत दर पाचव्या दिवशी एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले आहे. आतापर्यंत मारल्या गेलेल्या 75 दहशतवाद्यांपैकी बहुतांश पाकिस्तानी होते. यामध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) घुसखोरीच्या प्रयत्नांदरम्यान ठार झालेल्या 17 दहशतवाद्यांचा समावेश आहे.

तर जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात झालेल्या चकमकीत 26 दहशतवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांची ही कारवाई दहशतवाद्यांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. उपलब्ध आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, मारले गेलेले 42 गैर-स्थानिक दहशतवादी हे जम्मू क्षेत्रातील जम्मू, उधमपूर, कठुआ, डोडा आणि राजौरी या पाच जिल्ह्यांतील होते. (Kulgam Encounter: कुलगाम चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कराचे 4 जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी; शोध मोहीम सुरूच)

बारामुल्ला जिल्ह्यातील बहुतांश दहशतवादी उरी सेक्टरच्या सबुरा नाला भागात, मेन उरी सेक्टर, नियंत्रण रेषेजवळील कमलकोट उरी येथे मारले गेले. बारामुल्ला आणि नॉपोरा, हडीपोरा, सागीपोरा येथील चक टप्पर क्रिरी, वाटरगाम आणि सोपोरच्या राजपोर परिसरात काही दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे आता केवळ पाकिस्तानी दहशतवादीच सक्रिय आहेत. स्थानिक दहशतवादी गट जवळपास नेस्तनाबूत झाला आहे. 2024 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या 60 दहशतवादी घटनांमध्ये 32 नागरिक मारले गेले आणि सुरक्षा दलाचे 26 जवानही शहीद झाले होते.