ISROची दमदार मोहीम, स्वदेशी उपग्रह HySISसोबत 8 देशांचे 30 उपग्रह सोडले अवकाशात
भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमॅजिंग सॅटलाइट (HySIS)हा १ आणि इतर आठ देशांचे ३० असे मिळून ३१ सॅटेलाईट पीएसएलवी-सी43 (PSLV C43) रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात गुरुवारी (२९, नोव्हेंबर) अवकाशात झेपावले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organization) अर्थातच इस्रोने आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून तब्बल ३१ उपग्रह ( satellite)अवकाशात सोडले. भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमॅजिंग सॅटलाइट (HySIS)हा १ आणि इतर आठ देशांचे ३० असे मिळून ३१ सॅटेलाईट पीएसएलवी-सी43 (PSLV C43) रॉकेटच्या माध्यमातून अवकाशात गुरुवारी (२९, नोव्हेंबर) अवकाशात झेपावले. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हीकल (PSLV C43)चे हे सहावे उड्डाण होते. हे उपग्रह पृथ्वीपासून ५०४ किलोमीटर उंचीवर अवकाशात सोडले जातील.
या प्रक्षेपणाचे काऊंट डाऊन बुधवारी पाहाटे 5.58 मिनिटांपासून सुरु झाले. हे उपग्रह पृथ्वीवरील विविध भौगोलिक अभ्यासासह मॅग्नेटीक फील्डचेही निरिक्षण करतील. या उपग्रहांचा वापर राजकीय उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो. या महिन्यात उपग्रह प्रक्षेपणाची ही दुसरे लॉन्चींग आहे. या आधी १४ नोव्हेंबरला इस्त्रोने आपला उपग्रह जीसॅट-29 अवकाशात सोडला होता.
HySISबाबत बोलायचे तर 44.4 मीटर लांब आणि 230टन वजन असलेला हा उपग्रह PSLV C43च्या माध्यमातून अवकाशात सोडण्यात आला. PSLV C43 हे चार टप्प्यातील लॉन्चीक व्हीकल आहे. ज्यात इंधनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. PSLV C43चे वजन 380 किलो तर, इतर 30 उपग्रहांचे वजन 261.5 किलो इतके आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेट लॉन्चिंगच्या 112 मिनिटे(एक तास १२ मिनिट मिनिट) इतक्या कालावधीने ही मोहीम पूर्ण होईल. (हेही वाचा, हवा प्रदूषणाचा डंख)
या मोहीमेत ज्या देशांचे उपग्रह अवकाशात पाठवले त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, मलेशिया, नेदरलॅंड आणि स्पेन यात देशांचा समावेश आहे.