Financial Changes from July 2023: जुलै महिन्यात तुमच्या बजेटवर होणार परिणाम; ITR ते पेन्शनमध्ये होणार 'हे' मोठे आर्थिक बदल

याशिवाय, जर तुम्ही अद्याप तुमच्या आधारशी पॅन लिंक केले नसेल, तर तुम्हाला अजूनही संधी आहे. जर तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल, तर तुमचा पॅन निष्क्रिय असेल.

प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Financial Changes from July 2023: जुलै महिना सुरू होण्यासाठी केवळ काही तासांचा अवधी बाकी आहे. जून महिन्यातील कामं पूर्ण करण्यासाठी आज शेवटची संधी आहे. उद्यापासून वर्षाचा सातवा महिना जुलै सुरू होत आहे. या महिन्यात अनेक कामांची अंतिम तारीख आहे. हा महिना आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. जुलै महिन्यात आर्थिक कामाशी संबंधित कोणते काम आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

या महिन्यात तुम्हाला आयकर विवरणपत्र भरावे लागेल. याशिवाय, जर तुम्ही अद्याप तुमच्या आधारशी पॅन लिंक केले नसेल, तर तुम्हाला अजूनही संधी आहे. जर तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल, तर तुमचा पॅन निष्क्रिय असेल. (हेही वाचा - PAN-Aadhaar Linking Deadline Ends Today: पॅन क्रमांक आधार सोबत कसे लिंक करायचे? लिंक नसेल तर काय होईल? घ्या जाणून)

ITR फाइल -

आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर तुम्ही हे काम 31 डिसेंबरपर्यंत करू शकता. यासाठी तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी 26 जूनची अंतिम मुदत 11 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हालाही जास्त पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्ही 11 जुलैपर्यंत अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या पोर्टलवर दिलेली ऑनलाइन सुविधा पूर्ण करावी लागेल.

पॅन-आधार लिंक -

जर तुम्ही अद्याप आधारशी पॅन लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे फक्त एक दिवस शिल्लक आहे. जर तुम्ही हे काम आजपर्यंत म्हणजे 30 जून 2023 पर्यंत केले नाही तर तुमचा पॅन निष्क्रिय होईल. असे झाल्यास अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागेल. तुम्हाला कोणतेही प्रलंबित टॅक्स रिटर्न मिळणार नाही. तसेच तुम्हाला जास्त कर भरावा लागेल. पॅन निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही आयटीआर दाखल करू शकणार नाही.

HDFC बँक आणि HDFC चे विलीनीकरण -

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या महिन्यात विलीन होऊ शकतात. ते 1 जुलै किंवा 13 जुलै रोजी विलीन होण्याची शक्यता आहे. विलीनीकरणानंतर खातेदार आणि कर्जदारांनी गृहकर्जाचे दर, ठेव दर यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की तुमच्या जवळच्या एचडीएफसी लिमिटेडच्या शाखा बँक शाखांमध्ये बदलल्या जातील किंवा बंद केल्या जातील.