Wikipedia Top Search for 2023: Cricket, Bollywood, India यांचा यंदा विकीपिडियावर बोलबाला; पहा युजर्स ची कशाला पसंती

क्रिकेट आणि संबंधित लेख ठळकपणे दिसत असले तरी, या वर्षातील दोन प्रमुख ब्लॉकबस्टर चित्रपटांनी टॉप 25 मध्ये स्थान मिळवल्यामुळे बॉलीवूडही मागे नाही.

Wikipedia (File Image)

Wikimedia Foundation कडून दर वर्षाला जारी केली जाणारी विकीपिडिया वरील कोणती आर्टिकल्स सर्वाधिक पाहिली गेली याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये यंदाच्या यादीत पहिल्यांदाच भारताशी निगडीत विषयांवरील लेखांचा समावेश झाला आहे. टॉप 25 मध्य 7 विषय हे भारताशी निगडीत असल्याचं पहायला मिळालं आहे. जगभरात क्रिकेटची मोठी क्रेझ आहे. पण त्याचा आतापर्यंत कधीच इयर एंडर यादीत समावेश नव्हता पण 2023 च्या यादीत क्रिकेटशी निगडीत 16% लेखांचा समावेश आहे. ‘2023 Cricket World Cup’ या विषयाच्या लेखांचा समावेश आहे. यंदा भारतामध्ये विश्वचषक आयोजित केला होता आणि हा विषय यादीमध्ये तिसर्‍या स्थानी आहे. चौथ्या स्थानी ‘Indian Premier League’आहे. ‘Cricket World Cup’सहाव्या स्थानी आणि ‘2023 Indian Premier League’ नवव्या स्थानी असून त्यांनी एकूण 116.8 मिलियन पेजव्ह्यूज कमावले आहेत.

'2023 Cricket World Cup'या पेज वर मागील एडिशनच्या तुलनेत 304% अधिक इंटरेस्ट पहायला मिळाला आहे. '2019 Cricket World Cup’वर वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याच्या दिवशी 1.25 मिलियन व्ह्यूज आहेत. तर वर्ल्डकप मध्ये ‘Player of the Tournament’ठरलेल्या विराट कोहलीच्या पेजला दएखील 10 मिलियन पेक्षा अधिक व्ह्युज आहेत. Arshdeep Singh च्या सुरक्षेप्रकरणी केंद्र सरकारकडून थेट विकीपीडियाला नोटीस .

या यादीत क्रिकेट आणि संबंधित लेख ठळकपणे दिसत असले तरी, या वर्षातील दोन प्रमुख ब्लॉकबस्टर चित्रपटांनी टॉप 25 मध्ये स्थान मिळवल्यामुळे बॉलीवूडही मागे नाही. 'जवान' आणि 'पठान' या शाहरुख खान या शाहरूखच्या सिनेमांचा यादीत समावेश आहे. ते आठव्या क्रमांकावर आहेत. आणि अनुक्रमे 41.7 मिलियन पेज व्ह्यूज मिळून यादीत दहावे स्थान आहे. त्यांच्या रिलीजच्या तारखांच्या आसपास, दोन्ही चित्रपटांनी एकट्या इंग्रजी विकिपीडियावर एकाच दिवसात एक मिलियन व्ह्युज मिळवले आहेत.

“विकिपीडिया हा भारतातील आणि जगभरातील लोकांसाठी अद्ययावत आणि फॅक्ट चेक केलेल्या माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ज्याला सध्याच्या घडामोडींबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे किंवा एखाद्या विषयावर ज्ञान मिळवायचे आहे ते विनामूल्य मिळवू शकतात तसेच online encyclopedia सोबत ज्ञान वाटू देखील शकतात असे  Anusha Alikhan, Chief Communications Officer यांनी सांगितले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now