Union Budget 2020: कधी व कुठे पाहू शकता 2020 चा केंद्रीय अर्थसंकल्प; 'या' क्षेत्रांना असतील अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा
अर्थसंकल्पाच्या दिवसाला केवळ एक दिवस शिल्लक असतानाच, मोदी सरकार चालू असलेल्या मंदीच्या मागणीला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना करेल, अशी अपेक्षा जास्त आहे.
Union Budget 2020 Date And Time: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला दुसरा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सादर करतील. अर्थसंकल्पाच्या दिवसाला केवळ एक दिवस शिल्लक असतानाच, मोदी सरकार चालू असलेल्या मंदीच्या मागणीला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना करेल, अशी अपेक्षा जास्त आहे. तसेच केंद्र सरकार आयकर स्लॅब वाढविण्यावर विचार करू शकते, कारण त्याचा सामान्य लोकांना सर्वात जास्त त्रास होतो. त्याचसोबत 'इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स' सारख्या कर बचतीचा पर्याय देखील या अर्थसंकल्पात सादर होऊ शकतो. चला तर बघूया नक्की कधी आणि कुठे पाहता येईल Budget 2020.
केंद्रीय अर्थसंकल्प 2020 तारीख (Union Budget 2020 Date)
उद्या (31 जानेवारी रोजी) मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे आर्थिक सर्वेक्षण सादर करतील आणि 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल.
केंद्रीय अर्थसंकल्प 2020 वेळ (Union Budget 2020 Time)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास संसदेत सादर करतील. अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे की 2020 बजेट विशेष करून मंद अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर केंद्रित असेल.
बजेट 2020 चं Live Streaming कुठे पाहता येईल?
लोकसभा टीव्हीवर 2020 बजेट थेट प्रक्षेपित होईल (Union Budget 2020 Live Streaming).
Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?
अर्थसंकल्प 2020: मुख्य अपेक्षा (Union Budget 2020 Expectations)
करदाता, कॉर्पोरेट्स, कर तज्ञ, प्रत्येकाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. तथापि, मोदी सरकारसमोर या अर्थसंकल्पात मुख्य आव्हान असणार आहे मंदावलेली भारताची अर्थव्यवस्था