अलर्ट! 30 सप्टेंबरपर्यंत 'ही' 5 महत्वाची कामे करा; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
त्यामुळे तुम्ही जर रेशनकार्डला आधार कार्ड लिंक केलं नसेल किंवा विनामूल्य गॅस कनेक्शन प्रक्रिया पार पाडली नसेल तर तुमच्यासाठी खास माहिती. या महिन्या अखेर तुम्ही खालील काम केली नाही, तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.
उद्या म्हणजेच बुधवारी सप्टेंबर महिन्यातील अखेरचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही जर रेशनकार्डला आधार कार्ड लिंक केलं नसेल किंवा विनामूल्य गॅस कनेक्शन प्रक्रिया पार पाडली नसेल तर तुमच्यासाठी खास माहिती. या महिन्या अखेर तुम्ही खालील काम केली नाही, तर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.
1. 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा टॅक्स संदर्भातील हे कामं -
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने आयकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा देत 2018-19 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. त्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. जर करदात्याने या अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न दाखल केला नाही, तर तो रिटर्न भरू शकणार नाही. शक्यतो नियोजित तारखेपर्यंत आयकर विवरणपत्र न भरल्याबद्दल दंड आकारला जातो. आयटीआय दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै असल्यास आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही परतावा भरला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. (हेही वाचा - Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त?)
2. विनामूल्य एलपीजी कनेक्शन उपलब्ध होणार नाही -
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत (पीएमयूवाय) विनामूल्य गॅस कनेक्शन मिळण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2020 रोजी संपणार आहे. याआधी कोरोना संसर्गामुळे केंद्र सरकारने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान उज्ज्वला योजनेची (पीएम उज्ज्वला योजना) तारीख वाढविली होती. या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तर वेळ न गमावता 30 सप्टेंबरपूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी pmujjwalayojana.com डॉट कॉमवर जाऊन फॉर्म डाऊनलोड करून तो जवळच्या गॅस डिलरकडे जमा करावा.
3. रेशनकार्डसह आधार कार्ड लिंक करा -
तुमचं आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, कारण 30 सप्टेंबरनंतर तुम्हाला पीडीएस अंतर्गत स्वस्त धान्य मिळणार नाही. म्हणून, सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) अंतर्गत धान्य मिळविण्यासाठी, आपल्यास रेशन कार्डसह आपले आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. रेशन कार्डला आधारशी जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. म्हणजेच या कामासाठी आपल्याकडे केवळ आजचा दिवस आहे. (हेही वाचा - Update Aadhaar Address Online: घरबसल्या आधार कार्ड मध्ये पत्ता कसा अपडेट कराल?)
4. स्वस्त दरात घरे खरेदी करण्याची संधी -
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक हजारो मालमत्तांचा लिलाव करणार आहे. ज्यांना स्वस्त दरात घर विकत घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हे खास आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अशा लोकांना स्वस्त घरे, भूखंड किंवा दुकाने इत्यादी खरेदी करण्याची संधी देत आहे. यासाठी एसबीआयतर्फे 30 सप्टेंबर रोजी एक मेगा ई-लिलाव आयोजित केला जाणार आहे.
5. 30 सप्टेंबरनंतर टीव्ही खरेदी करणं होणार महाग -
1 ऑक्टोबरपासून टीव्ही खरेदी करणे देखील महाग होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीव्हीच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्या ओपन सेलच्या आयातीवरील 5 टक्के कस्टम ड्युटी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी सरकारने एक वर्षाची सूट दिली होती, जी 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे टीव्हीची किंमत 600 रुपयांवरून 1,500 रुपयांनी वाढेल.