Tatkal Ticket Booking Aadhaar Rule: तत्काळ तिकिटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य; 1 जुलै 2025 पासून नियम लागू
भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी तत्काळ तिकिटे बुक करताना आधार ओटीपीची सक्ती करण्यात आली आहे. 1 जुलै 2025 पासून IRCTC वर तत्काळ तिकिटे फक्त आधार प्रमाणीकरण असलेल्या वापरकर्त्यांद्वारेच बुक करता येणार आहेत. येथे Tatkal साठी आधार लिंकिंग आणि व्हेरिफिकेशनची माहिती घ्या जाणून.
भारतीय रेल्वेने प्रवास करण्यासाठी तत्काळ बुकिंग (Railway Ticket Booking) सुलभ करण्यासाठी आणि तत्काळ कोट्याचा गैरवापर रोखण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन नियम इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे केलेल्या सर्व तत्काळ बुकिंगवर लागू होईल. पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जुलै 2025 पासून IRCTC च्या वेबसाइट आणि अॅपवरून Tatkal तिकिट बुकिंग फक्त आधार प्रमाणीकरण केलेल्या वापरकर्त्यांद्वारेच करता येणार आहे.
IRCTC कडून आधार लिंक आणि व्हेरिफाय करण्याचे आवाहन
नवीन नियमानुसार तत्काळ बुकिंग प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी IRCTC ने सर्व वापरकर्त्यांना आधार कार्ड त्यांच्या IRCTC खात्याशी लिंक आणि व्हेरिफाय करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.
IRCTC खात्यात आधार प्रमाणीकरण कसे कराल?
आधार कार्ड त्यांच्या IRCTC खात्याशी लिंक आणि व्हेरिफाय करण्यासाठी आपण खालील पायऱ्या वापरु शकता.
- अधिकृत IRCTC वेबसाइट किंवा अॅपला लॉग इन करा.
- ‘My Account’ विभागात जा आणि ‘Authenticate User’ पर्याय निवडा.
- आपला PAN क्रमांक, आधार क्रमांक किंवा Virtual ID टाका.
- ‘Verify Details’ क्लिक करा.
- आपल्या आधार-लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका.
- सहमती चेकबॉक्स निवडा आणि ‘Submit’ वर क्लिक करा.
- जर प्रमाणीकरण अयशस्वी झाले, तर पुन्हा तपासून माहिती प्रविष्ट करा. प्रमाणीकरणाची स्थिती “Authenticate User” पर्यायामध्ये पाहता येईल.
IRCTC खात्यात आधार लिंक (संलग्न) कसा कराल?
- IRCTC पोर्टल ला भेट द्या आणि लॉग इन करा.
- ‘Profile’ टॅबमध्ये जा आणि ‘Link Aadhaar’ क्लिक करा.
- आधारकार्डवरील नाव व आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- सहमतीचा चेकबॉक्स सिलेक्ट करा आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा.
- नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा आणि ‘Verify OTP’ क्लिक करा.
- KYC माहिती आधारमधून मिळेल. ती पाहून ‘Update’ वर क्लिक करा.
- यशस्वी प्रमाणीकरणानंतर एक पॉप-अप संदेश दिसेल.
लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या बाबी
आधार लिंकिंग आणि प्रमाणीकरण पूर्ण करा: Tatkal बुकिंगसाठी हे अनिवार्य आहे.
- मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा: OTP साठी आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तो UIDAI वेबसाइटवरून अपडेट करता येतो.
- Tatkal बुकिंगसाठी तयारी ठेवा: Tatkal स्लॉट ओपन होताच जलद बुकिंगसाठी आधार लिंक आणि IRCTC लॉगिन आधीच तयार ठेवा.
- रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे Tatkal बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि वापरकर्ता-केंद्रित होणार आहे. प्रवाशांनी Tatkal बुकिंगमध्ये अडथळा येऊ नये म्हणून लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
तात्काळ तिकीट बुकिंग ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे, जी प्रवाशांना शेवटच्या क्षणी तिकीट आरक्षित करण्याची संधी देते. ही सेवा प्रवासाच्या एक दिवस आधी उपलब्ध होते—AC वर्गासाठी सकाळी 10:00 वाजता आणि Non-AC वर्गासाठी 11:00 वाजता. तात्काळ तिकीटांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते, जे तिकीटाच्या मूळ भाड्याच्या 10% ते 30% पर्यंत असते. रद्दीकरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून पुष्टी झालेल्या तिकीटांसाठी कोणतीही परतफेड मिळत नाही. 2025 पासून आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांना IRCTC प्रोफाइल आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)