Stock Market Update: शनिवारी उघडणार शेअर बाजार; जाणून घ्या सुट्टीच्या दिवशी ट्रेडिंग सत्र आयोजित करण्याचे कारण
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) यांनी आधीच ही माहिती दिली आहे. 2 मार्च रोजी विशेष थेट व्यापार सत्र आयोजित केले जाईल.
Stock Market Update: भारतीय शेअर बाजार (Stock Market) सोमवार ते शुक्रवार दरम्यान व्यवहारासाठी खुला असतो. शनिवार आणि रविवारी शेअर मार्केटला सुट्टी असते. पण, यावेळी शनिवारी म्हणजेच 2 मार्च रोजी शेअर बाजार खुला असणार आहे. त्यामुळे तुम्ही शनिवारीही व्यवहार करू शकाल. कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे कामकाजावर परिणाम झाला, तर त्याला कसे सामोरे जावे, याची माहिती देण्यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) यांनी आधीच ही माहिती दिली आहे. 2 मार्च रोजी विशेष थेट व्यापार सत्र आयोजित केले जाईल. यामध्ये, इंट्राडे काम आपत्ती पुनर्प्राप्ती साइटवर हलविले जाईल.
विशेष थेट ट्रेडिंग सत्रामध्ये प्राथमिक साइट (PR) पासून आपत्ती पुनर्प्राप्ती (DR) साइटवर इंट्रा-डे स्विच केले जाईल. एक्सचेंजेसने सांगितले की, शनिवारी दोन सत्रे होतील. पहिला सकाळी 9.15 ते सकाळी 10 या वेळेत प्राथमिक ठिकाणी आणि दुसरा सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 पर्यंत असेल. (हेही वाचा -Electoral Bonds: 'इलेक्टोरल बाँड्स' म्हणजे काय? देशात निवडणूक रोखे कधी आणि का आणले गेले? जाणून घ्या सविस्तर)
याआधी 20 जानेवारीलाही शनिवारी बीएसई आणि एनएसईवर विशेष ट्रेडिंग होते. NSE परिपत्रकानुसार, 'सदस्यांना सूचित केले जाते की, एक्सचेंज शनिवार, 2 मार्च रोजी प्राथमिक साइटवरून आपत्ती पुनर्प्राप्ती साइटवर इंट्राडे स्विचसह एक विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित करत आहे. हे इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये असेल.' (GPS-Based Toll Collection: आता महामार्गावरील प्रवास आणखी सुकर होणार; भारत लवकरचं GPS-आधारित टोल संकलन प्रणाली लागू करणार)
मार्चमध्ये शेअर मार्केट या दिवशी बंद राहणार -
मार्चमध्ये होळीसह अनेक सण आहेत, त्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. NSE परिपत्रकानुसार, 2024 मध्ये एकूण 14 ट्रेडिंग सुट्ट्या आहेत. यातील पाच सुट्या शनिवार आणि रविवारी असतील. यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी आहे. सोमवार, 25 मार्च रोजी होळी साजरी होणार आहे. त्याच वेळी, गुड फ्रायडे, 29 मार्च रोजी शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. जानेवारी महिन्यात शेअर बाजार एक दिवस बंद होता. फेब्रुवारीमध्ये शेअर बाजारात सुट्टी नसल्याने महिनाभर व्यवहार सुरू होते. केवळ शनिवारी, रविवारी शेअर बाजाराला सुट्टी होती.