SBI ने सुरु केली DoorStep Banking ची सुविधा; आता घरबसल्या करा बँकेची कामे

आपल्या ग्राहकांच्या सोयीचा विचार करुन बँकेने डोअर स्टेप बँकींग ही नवी सुविधा सुरु केली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आपल्या ग्राहकांसाठी नवी सुविधा (New Service) सुरु केली आहे. आपल्या ग्राहकांच्या सोयीचा विचार करुन बँकेने डोअर स्टेप बँकींग (Doorstep Banking) ही नवी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज भासणार नाही तर बँक खुद्द चालत तुमच्या दारापाशी येईल. ही सुविधा अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेची कामे आता घरबसल्या करणे शक्य होणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एकदा बँकेच्या शाखेत जावून रजिस्ट्रेशन करावे लागेल. (SBI मध्ये 8904 जागांसाठी क्लर्क भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शैक्षणिक योग्यता)

कोणाला मिळणार या सुविधेचा लाभ?

# या सुविधेचा लाभ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष व्यक्ती घेऊ शकतात. या सुविधेमुळे तुम्हाला बँकेची कामे करण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही.

# या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला KYC अपडेट करणे आणि मोबाईल नंबर रजिस्टर्ड करणे गरजेचे आहे.

# ही सुविधा पर्सनल अकाऊंट होल्डर्स साठीच उपलब्ध आहे. तसंच बँकेची शाखाही 5 किलोमीटरच्या परिसरात असणे आवश्यक आहे.

कोणकोणत्या सुविधा घरबसल्या मिळणार?

# रोख रक्कमेची देवाण-घेवाण.

# चेक, चेकबुक देणे, ड्रॉफ्ट देणे यांसारखी कामे.

# इनकम टॅक्स संबंधित काम करुन घेऊ शकता.

या सेवांसाठी किती शुल्क आकारण्यात येईल?

# स्टेट बँकेने घरबसल्या सुविधा देण्यासाठी अगदी माफक शुल्क आकारले आहे.

# प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी ग्राहकांना 100 रुपये द्यावे लागतील.

# इतर कामांसाठी 60 रुपये आकारण्यात येतील.

अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट www.sbi.co.in ला किंवा https://www.sbi.co.in/portal/web/services/doorstep-banking-services भेट द्या किंवा तुमच्या जवळच्या शाखेत जावून संपर्क साधा.