पाच लाख रुपये जिंका! SBI ग्राहकासाठी मोठी संधी, कसा कराल अर्ज?
विशेष म्हणजे स्पर्धेतील विजेत्या ग्राहकाला हे पैसे रोख स्वरुपात मिळणार आहेत. 24 जानेवारी 2019 पासून या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु होईल. स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अखेरची मुदत 7 फेब्रुवारी 2019 पर्यंत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी स्पर्धा घेऊन आली आहे. या स्पर्धेच्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास अनुक्रमे पाच आणि चार लाख रुपये मिळणार आहेत. एसबीआयने (SBI)या स्पर्धेला ‘SBI - Predict for Bank 2019’ असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे स्पर्धेतील विजेत्या ग्राहकाला हे पैसे रोख स्वरुपात मिळणार आहेत. 24 जानेवारी 2019 पासून या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु होईल. स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अखेरची मुदत 7 फेब्रुवारी 2019 पर्यंत आहे.
कशी असेल स्पर्धा?
या स्पर्धेत दोन टप्पे असतील. पहिला टप्पा आयडिएशन फेजचा असेल. तर, दुसरा टप्पा हॅकथॉन फेजचा असेल. यात बँक आपल्या काही ग्राहकांची नावे देईल. स्पर्धकाला सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करुन सांगायचे आहे की, त्या नावांपैकी असलेला ग्राहक लोन डिफॉल्ट करेल किंवा नाही. जर आपला अंदाज बरोबर निघाला तर, आपण बक्षिसासाठी पात्र ठरु शकता. या स्पर्धेत पहिले बक्षिस 5 लाख रुपयांचे आहे तर, दुसरे बक्षिस 4 लाख रुपयांचे आहे. (हेही वाचा, 7th Pay Commission: छप्पर फाड के बरसात! वाढीव पगाराची तारीख ठरली; 19 महिन्यांची उर्वरीत थकबाकीही मिळणार)
कसा कराल अर्ज?
नाव नोंदणी 7 फेब्रुवारीला संपल्यानंतर 12 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत हे मॉडेल तयार करावे लागेल. बँक यातील सर्व लोकांना मॉडेल दाखवेन. त्यानंतर विजेच्या ग्राहकांना रोख बक्षिस देईन. या स्पर्धेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी sbi.stockroom.io/register लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळू शकेल.