SBI Doorstep Banking: एसबीआय ग्राहकांच्या घरी जाऊन देते 'या' सुविधा; जाणून घ्या डोअरस्टेप बँकिंग सेवेशी संबंधित खास गोष्टी

या सेवांमध्ये रोख रक्कम देणे, रोख रक्कम घेणे, धनादेश जमा करणे, मुदत ठेव सल्ला देणे, जीवन प्रमाणपत्र आणि केवायसी कागदपत्रे यासारख्या सुविधा आहेत.

SBI (Photo Credit - PTI)

SBI Doorstep Banking: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक घरीबसून बँकिंगचे काम करू शकतात. जर ग्राहकांना आणीबाणीच्या काळात रोख रक्कम हवी असेल तर बँक ग्राहकांना ही रोख रक्कम घरी पोचविण्यास तयार आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना होम बँकिंग सेवा देत आहे. एसबीआय ग्राहक या सुविधेचा वापर केवळ काही निवडक शाखेवर करू शकतात. आपण अद्याप एसबीआयच्या डोर स्टेप बँकिंग सुविधेसाठी नोंदणी केली नसेल तर लवकरचं यासाठी अॅप्लाय करा.

एसबीआयने ट्वीटद्वारे ग्राहकांना आपल्या डोअर स्टेप सेवांविषयी माहिती दिली आहे. आपल्याला या सुविधेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, आपण टोल फ्री क्रमांकावर 18001037188 किंवा 18001213721 वर कॉल करू शकता. चला तर मग बँकेच्या या सेवेशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊयात... (Post Office National Savings Certificate Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस योजनेत केवळ 5 वर्षात मिळणार 21 लाख रुपये; 100 रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक)

SBI Doorstep Banking सुविधा -

आर्थिक सेवांसाठी आकारण्यात येणारे शुल्क -

विना-आर्थिक सेवांसाठी शुल्क -

मुदत ठेव सल्ला आणि खाते विवरण (बचत बँक खाते) - विनामूल्य

करंट अकाउंट स्टेटमेंट (कॉपी) - 100 + जीएसटी

अशाप्रकारे तुम्ही वरील सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला बँकेने दिलेल्या संबंधित नियमांचे पालन करावे लागेल. तसेच बँकेच्या वेबसाईटवरून जाऊन डोअरस्टेप बँकिंग सेवाकरिता नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही बँकेच्या कामकाजाच्या दिवशी तुम्ही तुमची काम घरबसल्या पूर्ण करू शकता.