SBI ATM Rule Changes From July 1, 2021: एसबीआय ग्राहकांना 1 जुलैपासून नवा भुर्दंड; ATM, Checkbook अथावा बँक शाखेतून 4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास द्यावे लागणार शुल्क

एसबीआयने म्हटले आहे की, जर कोणी एसबीआय ग्राहक त्यांच्या बँक शाखेतून, त्यांच्या एटीएम अथवा इतर बँकेच्या एटीएममधून 4 पेक्षा अधिक वेळा रोख रक्कम काढत असेल तर त्यावर 15 रुपये आणि GST आकार द्यावा लागेल. हा आकार 4 वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढली तर प्रत्येक व्यवहारावर द्यावा लागेल.

SBI ATM | (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय (SBI) उद्यापासून म्हणजेच 1 जूले 2021 पासून काही नवे नियम लागू करत आहे. देशातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेली एसबीआय आता प्रत्येक महिन्यात जर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून एटीएमच्या माध्यमातून (ATM Cash Withdrawl) अथवा बँक कार्यालयातून रोख (Bank Transaction) रक्कम चार पेक्षा अधिक वेळा काढल्यास त्यासाठी शुल्क आकारणार आहे. बँकेच्या या निर्णयाचा ग्राहकावर मोठा परिणाम होणार आहे. कारण, देशातील जवळपास एक तृतियांश जनतेची खाती स्टेट बँक ऑफ इंडियात आहेत. या सर्व एसबीाय खातेदारकांनाक एक वर्षात चेकबुक (Cheque Book) च्या 10 पेक्षा अधिक व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

एसबीआयने म्हटले आहे की, जर कोणी एसबीआय ग्राहक त्यांच्या बँक शाखेतून, त्यांच्या एटीएम अथवा इतर बँकेच्या एटीएममधून 4 पेक्षा अधिक वेळा रोख रक्कम काढत असेल तर त्यावर 15 रुपये आणि GST आकार द्यावा लागेल. हा आकार 4 वेळेच्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढली तर प्रत्येक व्यवहारावर द्यावा लागेल. रोख रक्कम ते चेक बुक सारख्या सेवांवरही ग्राहकांनी 15 ते 75 रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागणार आहे. ही व्यवस्था 1 जुलैपासून लागू होत आहे. दरम्यान, बँक शाखा, एटीएम अथवा कॅश सिस्पेंसिंग मशीनवर पैशांचे डिजिटल व्यवहारांचे आदान-प्रदान मात्र निशुल्क असेन. (हेही वाचा, SBI Clerk Admit Card 2021: एसबीआय क्लर्क परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी; sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता हॉल तिकीट)

एसबीायने म्हटले आहे की, खातेधारक (Basic Savings Bank Deposit) प्रत्येक आर्थिक वर्षात चेकबुकच्या 10 लीव म्हणजे 10 चेकवर निशुल्क व्यवहार करु शकतील. त्यानंतर प्रत्येक 10 लीफवर एक आणि चेकबुकवर 40 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. जो 25 लीफच्या चेकबुकसाठी 75 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल. जर तातडीने चेकबुकची आवश्यकता असेल तर खातेधारकास (BSBD Account Holders) 50 रुपये शुल्क आणि जीएसटी भरून प्रत्येक 10 चेकच्या हिशोबाने शुल्क द्यावे लागेल. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी चेकबुक सेवा निशुल्क असणार आहे. बीएसबीडी खात्यांना शुन्य बाकी बचत खाते असेही म्हणतात. केवायसी केल्यावर ग्राहकांना बँक खाते उघडता येते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now