Ministry of Defence Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीची संधी; 10 वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज!
ट्रान्झिट कॅम्प / मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप / मूव्हमेंट कंट्रोल / मूव्हमेंट फॉरवर्डिंग डिटेचमेंट्सने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट सी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
Ministry of Defence Transit Camp कडून नोकरभरती जाहीर केली आहे. यामध्ये उमेदवारांना ग्रुप सी सिव्हिलिअन पोस्ट साठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान यासाठीचे रिक्रुटमेंट नोटिफिकेशन 29 जानेवारीच्या Employment Newspaper मध्ये जारी करण्यात आले आहे. दरम्यान नोटीफिकेशन जारी झाल्यापासून पुढील 21 दिवस अर्ज करण्याची मुदत असणार आहे. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार असल्याने अनेकांसाठी संधी आहे.
ट्रान्झिट कॅम्प / मूव्हमेंट कंट्रोल ग्रुप / मूव्हमेंट कंट्रोल / मूव्हमेंट फॉरवर्डिंग डिटेचमेंट्सने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट सी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या नोकरभरती मध्ये 41 जागांवर नोकरीची संधी आहे. त्यामध्ये सफाईवाला - 10 जागा, वॉशरमॅन -3, मेस वेटर 6, कूक 16, हाऊस कीपर -2, बार्बर 2 आणि मसालची 2 अशा जागा आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी पास आवश्यक आहे तर वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. इथे पहा नोटिफिकेशन!
नोकरीमध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या नोकरभरतीमध्ये पात्र उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्जानुसार आणि आवश्यक कागदपत्रासोबत अर्ज करू शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2022 01:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

