UIDAI PAN Card Update: आता Online पद्धतीने पॅन कार्ड करा अपडेट; @ tin.nsdl.com वर अप्लाय करा 

ज्याचा वापर करदात्याच्या आर्थिक माहितीचा तपशील ठेवण्यासाठी होतो. कर सूचना नेटेवर्क (Tax Information Network) पॅन कार्डशी संबंधीत पत्ता आणि इतर माहितीशी संबंधीत तपशील बदलण्यासाठी सेवा पूरवते.

PAN Card Update | (Photo Credit- File Photo)

UIDAI PAN Card Update: जर तुम्हाला पॅन कार्ड (PAN Card) नव्या माहितीने अद्ययावत करायचे आहे. PAN Card वरील माहिती चुकली आहे, ती बदलायची आहे, असे काहीही असेल तर, काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. PAN Card वरील माहिती बदलण्यासाठी आता एनएसडीएल (National Securities Depository Limited) द्वारा ई-गव्हर्नन्स वेबसाईट www.tin.nsdl.com वर एक ऑनलाईन सूविधा देण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही PAN Card वरील आवश्यक ती सर्व माहिती बदलू शकता. त्यासाठी तुम्ही पुढील पद्धत वापरु शकता.

PAN Card वर एक 10 अंकी Alphanumeric क्रमांक दिलेला असतो. ज्याचा वापर करदात्याच्या आर्थिक माहितीचा तपशील ठेवण्यासाठी होतो. कर सूचना नेटेवर्क (Tax Information Network) पॅन कार्डशी संबंधीत पत्ता आणि इतर माहितीशी संबंधीत तपशील बदलण्यासाठी सेवा पूरवते. कर सूचना नेटवर्क आयकर विभागाचे एक पुढचे पाऊल आहे. ज्यामुळे करदात्यांना अधिक सोप्या पद्धतीने माहिती आणि अडचणींचा निपटारा करता येऊ शकेल.

कसा बदलाल पॅन कार्डवरील तपशील?

PAN Card वरील माहिती बदलण्यासाठी एनएसडीएल (NSDL) वेबसाईट www.tin.nsdl.com ला भेट द्यावी लागेल. इथे तुम्हाला माहितीतील बदलासाठीचा फॉर्म मिळेल. या फॉर्मसाठी तुम्हाला नव्या PAN Card साठी अप्लाय किंवा माहितीतील बदल आदी तपशीलांवर क्लिक करावे लागेल. युजरला इथे दिलेले सर्व फॉर्म भरावे लागतात. तसेच, संवादासाठी पत्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या चौकटीत टीक करावे लागते. ऑनलाईन अर्ज करताना या बॉक्समध्ये डिफॉल्ट रुपात टीक होते. (हेही वाचा, Aadhaar-PAN Linking: आधार-पॅन कार्ड जोडण्यासाठी CBDT ची सहा महिन्यांची मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत लिंक करण्याची संधी)

पत्ता बदलत असताना

इथे आपल्याला सांगावे लागते की, तुम्ही बदलत असलेल्या पत्ता हा घरचा आहे की ऑफिसचा. NSDL च्या माहितीनुसार व्यक्ती आणि HUF म्हणजेच हिंदू अविभाजित कुटुंबाशिवाय युजर्सला कार्यालयाच्या पत्त्याचा उल्लेख संवादासाठी पत्त्याच्या रुपात करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही कोणता इतर पत्ता अपडेट करत असाल तर, त्यासाठी एक अतिरीक्त शीटमध्ये त्याचा तपशील भरणे गरजेचे आहे. हा तपशील मूळ फॉर्मसोबत द्यायचा आहे.

नव्या पत्त्याचा पूरावा द्या

इथ्ये ध्यानात घ्या की, आपण जो पत्ता अपडेट करु इच्छितो त्यासाठी आवश्यक ते प्रमाणपत्र पूरावा म्हणून देणे गरजेचे आहे. एनएसडीएलने दिलेल्या माहितीनुसार इतर पत्त्यामध्ये बदल करण्याची मागणी केली जात असेल तर, युजरला तसे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.

कुठे कराल अर्ज

आवश्यक कागदपत्रं आणि योग्य पद्धतीने भरलेला फॉर्म एनएसडीएल टिन-सुविधा केंद्र किंवा पॅन केंद्रात जमा करता येऊ शकते. ऑनलाईन अर्जासाठी योग्य हस्ताक्षरात भललेला आणि फोटो लावलेला अर्ज पावतीसह योग्य पत्त्यावर पाठवा. त्यासाठी पत्ता पुढीलप्रमाणे : Income Tax PAN services unit (Managed by NSDL e-Governance Infrastructure Limited), 5th Floor, Mantri Sterling, Plot No. 341, Survey No. 997/8, Model Colony, Near Deep Bungalow Chowk, Pune – 411 016.