Income Tax Refund: तुम्ही ITR फाईल करून देखील 7 दिवसांत रिफंड मिळाला नसेल तर या 'चूका' तर केल्या नाहीत ना? नक्की तपासून पहा

पण तुमची रिटर्नची अपेक्षित रक्कम अद्याप तुमच्या खात्यात आली नसेल तर काही तांत्रिक चूका त्यामागे कारणीभूत असू शकतात.

Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

भारतामध्ये यंदा कोरोना वायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा 2019-20 चा आयटीआर फाईल (ITR) करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा 10 जानेवारी ही आयटीआर फाईल करण्याचीअंतिम मुदत होती. दरम्यान आयकर विभागाकडून आता रिटर्न करदात्यांना देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या खात्यामध्ये त्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान रिटर्न फाईल केल्यानंतर 7 दिवसांमध्ये ती रक्कम खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित असतं. पण तुमची रिटर्नची अपेक्षित रक्कम अद्याप तुमच्या खात्यात आली नसेल तर काही तांत्रिक चूका त्यामागे कारणीभूत असू शकतात. तुमचा रिटर्न अद्याप आला नसेल तर कदाचित तुमच्या कडून कळत नकळत या चूका तर झाल्या नाहीत ना? हे एकदा तपासून पहा. खुशखबर! Income Tax Return रिफंड प्रक्रीया आता एका दिवसात होणार.

इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स

तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल ऑनलाईन तुम्ही तपासू शकता. यासाठी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. लॉगिंग आयडी, पासवर्ड आणि पॅन कार्ड नंबर त्यासाठी आवश्यक असतो.

बॅंकेचे अकाऊंट प्री- व्हॅलिडेशन

प्री वॅलिडेट केलेल्या बॅंक अकाऊंट मध्येच तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न जमा होऊ शकतो. हे इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईट द्वारा केले जाऊ शकते.

आयटीआर व्हेरिफाईड नसल्यास

आयटीआर रिफंड मिळवण्यासाठी तुम्हांला तो व्हेरिफाईड करणं देखील आवश्यक आहे. यामध्ये तुम्हांला ऑनलाईन ऑफलाईन पर्याय असतात. त्यामुळे तुम्ही ते केले आहे की नाही? हे एकदा नक्की तपासून पहा.

बॅंक अकाऊंट डीटेल्स क्रॉस चेक करून पहा

तुम्ही माहिती भरताना बॅंक अकाऊंट डिटेल्स योग्य रित्या भरले नसतील तर तुम्हांला रिफंड मिळण्यास अडचण येऊ शकते.

दरम्यान नुकतीच आयकर रिटर्न  भरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्री फाईल टॅक्स रिटर्न फार्म्स आणि आयकर रिटर्न फायलिंगची प्रक्रीया वेगवान करणयसाठी मोदी सरकार पाऊल उचलत आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या व्यवस्थेसाठी सुमारे 4,241.9 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत.