FASTag ला आता Prepaid touch and Go Card चा पर्याय; NHAI ची 1 जानेवारीपासून नवी सुविधा

प्रीपेड कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहकांना नेट बॅंकिंग किंवा PoS वर रिचार्ज करण्याची सुविधा असेल.

Toll Plaza | Image used for representational purpose only. | (Photo Credits: Wikimedia )Commons

खाजगी कार असो किंवा टॅक्सी, आता सार्‍यांनाच FASTag बंधनकारक असेल. फास्ट टॅग नसल्यास दुप्पट पैसे आकारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता फास्ट टॅग नसला तरीही तुम्हांला टोल नाक्यावर प्री-पेड टच-एंड-गो कार्ड (Prepaid touch and Go Card ) वापरून पैसे वाचवता येऊ शकतात. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI)द्वारा आता टोल नाक्यावर गर्दी टाळण्यासाठी 1 जानेवारीपासून हायब्रिड लेन सुरू करणार आहेत. या लेनवरच प्री-पेड कार्ड सुविधा सुरू केली जाणार आहे. नववर्षासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1 जानेवारी 2021 पासून चारचाकी वाहनांवर 'FASTag' होणार बंधनकारक

1 जानेवारीपासून टोल प्लाझावर आर्थिक देवाण घेवाण कमी करण्यासाठी हळूहळू सार्‍या लेन फास्ट टॅग लेन मध्ये बदलल्या जाणार आहेत. फास्ट टॅग नसल्यास प्री-पेड कार्डचा नागरिकांना पर्याय असेल. आता नव्या आणि जुन्या गाड्यांवरही फास्ट टॅग आवश्यक आहे. टोल प्लाझावर पॉईंट ऑफ सेल द्वारा हे प्री पेड कार्ड खरेदी केले जाऊ शकतं. फास्ट टॅग ऐवजी हे कार्ड वापरल्यास दुप्पट देण्याची गरज नाही. तुमच्याकडे फास्ट टॅग असेल तरीही या कार्डचा वापर केला जाऊ शकतो. फास्ट टॅग ब्लॅक लिस्टेट किंवा फेल गेल्यास, रिचार्ज करण्यास विसरल्यास किंवा अपुरे पैसे असल्यास हे प्री पेड कार्ड मदतीला येऊ शकतं.

भारतीय राजमार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेड (IHMCL) ने याबाबत टेंडर मागवले आहेत. त्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. प्री पेड कार्ड खरेदी आणि रिचार्ज करण्यासाठी आता प्रत्येक टोल प्लाझावर पॉइंट-ऑफ-सेल्स (PoS)बनवले जाणार आहेत. प्रीपेड कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहकांना नेट बॅंकिंग किंवा PoS वर रिचार्ज करण्याची सुविधा असेल. सध्याच्या घडीला प्रत्येक टॉल नाक्यावर आर्थिक व्यवहारांसाठी 2 लेन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र 1 जानेवारी पासून ही सुविधा संपुष्टात येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif