Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून
त्यातही भारतीय गुंतवणुकदारांना आजकाल विदेशी गुंतवणूक भूरळ घालते. भारतीयांना जसे विदेशाचे (Foreign Countries) आकर्षण असते तसेच आकर्षण विदेशी गुंतवणुकीबाबतही असते.
गुंतवणूक म्हटलं की अलिकडील काळात अनेक लोकांना म्युच्यअल फंड (Mutual Fund) आठवतात. त्यातही भारतीय गुंतवणुकदारांना आजकाल विदेशी गुंतवणूक भूरळ घालते. भारतीयांना जसे विदेशाचे (Foreign Countries) आकर्षण असते तसेच आकर्षण विदेशी गुंतवणुकीबाबतही असते. त्यामुळे अनेक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करताना विदेशी शेअर बाजार (Foreign Stock) निवडताना दिसतात. असे असले तरी अनेक लोकांना हे माहिती नाही की, विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक (Foreign Companies) जसे फायद्याचे ठरते तसेच अनेकदा जोखमीचेही ठरु शकते. त्यामुळे याबाबत माहिती ठेवणे कधीही चांगले.
सर्वसामान्य गुंतवणुकदारही विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणुक करु शकतो. खास करुन म्यूचुअल फंडच्या एमएनसी (MNC) फंड मध्ये. एमएनसी कंपन्या या विदेशातील अनेक कंपन्यांसोबत गुंतवणुक करत असतात. या कंपन्यांचे एक मुख्य ऑफिस असते (Central Office) . या ऑफिसद्वारे या कंपन्या जगभरात गुंतवणूक करत असतात. या एमएनसी कंपन्या ग्लोबल प्रोडक्ट आणि सेवाएं (Global Product & Services) पुरवतात. ज्यात विविध प्रकारचे इनोव्हेटीव्ह आणि चांगल्या प्रकारचे ऑर्गनाइजेशनल कल्चर पाहायला मिळते. त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांनाही मोठी संधी उपलब्ध होते. (हेही वाचा, SIP Mutual Funds: म्यूच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ; पाच वर्षात मालमत्ता मूल्य 30% वाढून 4.64 लाख कोटी रुपयांवर)
काही अपवाद वगळता बहुतांशवेळा एमएनसी म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्या या चांगल्याच कंपन्या असतात. ज्यांची आर्थिक स्थिती आणि गुंतवणुकदारांची सेवा, विश्वास चांगला असतो. यांकपन्या विविध कंपन्यांसोबत स्पर्धात्मक पातळीवरही भक्कम राहिलेल्या दिसतात. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुक करणे अनेकदा फायदेशीर ठरते. असे असले तरी आर्थिक निर्णय हे स्वत: गुंतवणुकदाराला त्याच्या त्याच्या पातळीवरच घ्यायचे असतात. भविष्यातील फायदे-तोटे, जोखीम या सर्वांचा विचार स्वत: गुंतवणुकदाराने करायचा असतो. असा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.
विश्वास आणि सातत्य हे कोणत्याही कंपनीसाठी भक्कम पाया ठरतो. प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता नेहमीच चांगली असते. त्यामुळे गुंतवणुक करताना कोणत्याही कंपनीची सध्याची कामगिरी, तिचा इतिहास, भविष्यातील ध्येय धोरणे आदी गोष्टींचा विचार करुन मगच गुंतवणूक करावी. अभ्यास नसताना केलेली गुंतवणूक अनेकदा धोक्याची ठरु शकते. त्यामुळे आर्थिक जागृती, पुरेशी माहिती आणि ज्ञान आवश्यक असते.