Maharashtra Exit Poll 2019: एक्झिट पोल म्हणजे नक्की काय? खरंच त्याने मिळतो का निकालाचा अंदाज? वाचा सविस्तर
आज महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात आलं असून त्याचा निर्णय ठरणार आहे 24 ऑक्टोबर रोजी. येत्या 24 तारखेला राज्यभर मतमोजणी होणार असली तरी आताच अनेक वाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल्स जाहीर केले आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एक्झिट पोल म्हणजे नक्की काय?
मतमोजणीच्या आधी निकालाचे अंदाज वर्तवले जातात आणि यालाच एक्झिट पोल असे म्हणतात. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. एक्झिट पोलने दिलेला अंदाज तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो. हा एक्झिट पोल नेहमी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो.
काय आहे एक्झिट पोलची प्रक्रिया?
ज्यादिवशी मतदान होते त्याच दिवशी एक्झिट पोल घेतला जातो. मतदान करुन आल्यानंतर मतदाराने कोणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं व त्यासोबत मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती घेतली जाते. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे एक सर्व्हे तयार केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये यात नक्की फरक काय?
ओपिनियन पोल हा नेहमी मतदानापुर्वी सादर करण्यात येतो. तर एक्झिट पोल मतदान झाल्या नंतर सादर केलं जातो. ओपनियन पोलने दिलेले अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर नक्कीच निर्भर राहू शकतो.
राज ठाकरे यांना धक्का? एक्झीट पोल्स अंदाजानुसार मनसे रेल्वे इंजिन यार्डात?
पहिला एक्झिट पोल...
नेदरलँड देशातील समाजशास्त्र अभ्यासक आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. 15 फेब्रुवारी 1967 रोजी पहिला एक्झिट पोल जाहीर करण्यात आला होता.