Loan From EPFO: PF खात्यातून कर्ज मिळते का? ईपीएफओचे नियम, अटी आणि क्लेम करण्याची सोपी ऑनलाइन प्रक्रिया

EPFO Transfer | (Photo credit: archived, edited, representative image)

नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातील काही हिस्सा दरमहा भविष्य निर्वाह निधी अर्थात 'ईपीएफ' (EPF) खात्यात जमा होतो. आणीबाणीच्या काळात किंवा मोठ्या आर्थिक गरजांच्या वेळी आपल्या हक्काच्या या पैशांची आठवण होते. अनेक कर्मचाऱ्यांना असा प्रश्न पडतो की, बँकेप्रमाणे ईपीएफओकडून (EPFO) वैयक्तिक कर्ज (Loan) घेता येते का? याचे साधे उत्तर म्हणजे ईपीएफओ थेट कोणतेही कर्ज देत नाही; मात्र आपल्याच खात्यातील रकमेतून 'नॉन-रिफंडेबल ॲडव्हान्स' (Non-refundable Advance) स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

​हा कोणताही पारंपरिक कर्जाचा प्रकार नसल्यामुळे त्यावर व्याज आकारले जात नाही किंवा ईएमआय (EMI) भरून ही रक्कम परत करावी लागत नाही. हे पैसे नेमके कधी, किती आणि कसे काढता येतात, याविषयीचे सविस्तर नियम समजून घेऊया.

​कोणत्या कारणांसाठी मिळते आगाऊ रक्कम?

ईपीएफओने ठरावीक वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजांसाठी पीएफ ॲडव्हान्स काढण्याची परवानगी दिली आहे:

​वैद्यकीय उपचार: स्वतःसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या (आई-वडील, पती/पत्नी, मुले) गंभीर आजारपणावरील उपचारांसाठी कोणतीही किमान सेवा कालावधीची अट नाही. यामध्ये ६ महिन्यांचा बेसिक पगार + महागाई भत्ता (DA) किंवा कर्मचाऱ्याचा व्याजासह असलेला एकूण हिस्सा यापैकी जी रक्कम कमी असेल, ती काढता येते.

​विवाह सोहळा: स्वतःचे, मुलांचे किंवा भावंडांच्या विवाहासाठी किमान ७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या योगदानाच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते. ही सुविधा कारकिर्दीत जास्तीत जास्त तीन वेळा वापरता येते.

​उच्च शिक्षण: मुलांच्या दहावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी ७ वर्षांच्या सेवेनंतर कर्मचाऱ्याच्या योगदानाच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा आहे.

घर खरेदी किंवा बांधकाम: ५ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर घर किंवा फ्लॅट खरेदी, भूखंड खरेदी अथवा घराच्या बांधकामासाठी ठरावीक मर्यादेत (३६ महिन्यांचा बेसिक + DA किंवा एकूण शिल्लक रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत) निधी काढता येतो.

​घराची दुरुस्ती / नूतनीकरण: घराच्या दुरुस्तीसाठी ५ वर्षांच्या सेवेनंतर १२ महिन्यांच्या बेसिक पगाराएवढी रक्कम काढता येते.

​गृहकर्ज परतफेड: सुरू असलेल्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी किमान १० वर्षांच्या सेवेनंतर पीएफ खात्यातील एकूण रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत पैसे काढता येतात.

​अर्ज करण्यापूर्वी आवश्यक गोष्टी

​सक्रिय युएएन (UAN): युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय असणे आणि तो आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे.

​केवायसी (KYC) पडताळणी: बँक खाते क्रमांक, आयएफएससी (IFSC) कोड आणि पॅन (PAN) तपशील पोर्टलवर पडताळलेले असावेत.

​मोबाईल क्रमांक: आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक चालू असावा, कारण अंतिम पडताळणीसाठी त्यावर ओटीपी (OTP) येतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement