LIC येत्या 30 नोव्हेंबरपासून अनेक विमा पॉलिसी प्लान करणार रद्द ; पाहा काय आहे कारण?
यात व्यक्तिगत विम्यासह जीवन आनंद (Jeevan Anand), जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ यांसारख्या अनेक विमा पॉलिसीचा समावेश आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी अर्थातच भारतीय जीवन बीमा निगम अर्थाच एलआयसी (LIC) येत्या 30 नोव्हेंबरपासून आपले अनेक प्लान रद्द करणार असल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एलआयसी येत्या काही काळात दोन डजूनहून अधिक व्यक्तिगत विमा प्रोडक्ट्स (Individual Insurance Products), 8 ग्रुप इंश्योरन्स योजना आणि 7 ते 8 राइडर्स येत्या 30 नोव्हेंबर पासून बंद करणार आहे. यात व्यक्तिगत विम्यासह जीवन आनंद (Jeevan Anand), जीवन उमंग, जीवन लक्ष्य आणि जीवन लाभ यांसारख्या अनेक विमा पॉलिसीचा समावेश आहे.
एलआयसी चेअरमन एम.आर. कुमार यांच्या हवाल्याने फाइनेंशियल क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, एलआयसी येत्या काही काळात अनेक प्रॉडक्ट बंद करत आहे. हे प्रॉडक्ट नव्या अभ्यासानंतर सुधारित अवृत्तीत पुन्हा लॉन्च करण्यात येणार आहेत. प्रसारमाध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीने या स्कीम येत्या काही महिन्यांमध्ये इन्शुरन्स रेग्युलेटरच्या रिवाइज कस्टमर केंद्रीत गाईडलाईननुसार रिलॉन्च करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा,LIC ग्राहकांसाठी खुशखबर! दोन वर्षांपासून बंद असलेली विमा पॉलिसी पुन्हा सुरु करता येणार )
दरम्यान, नव्या प्रॉडक्टमध्ये कमी बोनस आणि अधिक प्रीमियम रेट असू शकतो. इडस्ट्रीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लाइफ इन्शुरन्स कपन्या सुमारे 80 इन्श्योन्स प्रोडक्ट्स 30 नोव्हेंबरनंतर बंद होणार आहेत. दरम्यान, हे प्लान 8 जुलै 2019 रोजी जारी झालेल्या इन्शुरन्स प्रॉडक्ट रेग्युलेशननुसार नाहीत.