LIC चा Micro Bachat Insurance प्लॅन लॉन्च; जाणून घ्या काय आहे खासियत
मायक्रो बचत असे या रेग्युलर प्रीमियम प्लॅनचे नाव असून याची काही खास वैशिष्ट्य आहेत.
LIC Micro Bachat: भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने नवा इंश्योरन्स प्लॅन लॉन्च केला आहे. 'मायक्रो बचत' (Micro Bachat) असे या रेग्युलर प्रीमियम प्लॅनचे नाव असून याची काही खास वैशिष्ट्य आहेत. या इंश्योरन्स प्लॅनमध्ये 50 हजार रुपयांपासून ते 20 लाखांपर्यंतचा विमा मिळेल. हा नॉन लिंक्ड इंश्योरन्स प्लॅन आहे.
प्लॅनच्या मॅच्युरिटीनंतर पॉलिसीधारकांना एकहाती रक्कम मिळेल. पॉलिसीधारकांना काही झाल्यास विम्याची पूर्ण रक्कम त्यांच्या कुटुंबियांना मिळेल. तसंच या प्लॅनअंतर्गत पॉलिसीमध्ये लॉयल्टीचा फायदा देखील मिळेल. 3 वर्ष प्रीमियम दिल्यास मायक्रो बचत प्लॅनमध्ये लोनची सुविधा देखील दिली जात आहे. LIC पॉलिसी धारकांनो! 1 मार्चपूर्वीच 'हे' काम करा अन्यथा पॉलिसी मॅच्युअर होऊन देखील अडकतील तुमचे पैसे
ही विमा योजना 18 ते 55 वयोगटातील लोकांपूरती मर्यादीत आहे. यासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही. 3 वर्ष नियमित प्रीमियम भरल्यावर त्यानंतर प्रीमियम भरायला जमत नसल्यास 6 महिन्यांपर्यंत विम्याची सुविधा सुरु राहील. पॉलिसी धारकांनी 5 वर्षांपर्यंत प्रीमियम भरल्यानंतर त्यांना 2 वर्षांचे ऑटो कव्हर मिळेल.
मायक्रो बचत प्लॅनमध्ये वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक स्वरुपात प्रीमियम भरु शकता. यात तुम्हाला एलआयसीच्या एक्सीडेंटल रायडरची सुविधा देखील मिळेल. मात्र यासाठी तुम्हाला वेगळा प्रीमियम भरावा लागेल.
मायक्रो इंश्योरन्स प्लॅनमध्ये 10, 12 आणि 15 वर्षे प्रीमियम भरण्याचा पर्याय मिळेल. यात जर 18 वर्षाच्या व्यक्तीने 15 वर्षांसाठी प्लॅन घेतल्यास प्रती हजार 51.5 रुपये प्रीमियम द्यावा लागेल. तर 15 वर्षांच्या काळासाठी 25 आणि 35 वर्षांच्या व्यक्तींना अनुक्रमे 51.60 रुपये आणि 52.20 रुपये प्रती हजार प्रीमियम द्यावा लागेल.
10 वर्षांच्या प्लॅनसाठी प्रीमियम 85.45 ते 91.9 रुपये प्रती हजार रुपये असेल. प्रीमियमध्ये 2% सूट देखील मिळेल. तसंच इंश्योरन्स घेतल्यानंतर तुम्हाला न आवडल्यास तुम्ही 15 दिवसांच्या आत प्लॅन परत करु शकता.