Indian Navy Recruitment: बारावी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी, त्वरा करा अर्ज भरण्यासाठी केवळ 5 दिवस शिल्लक
पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment) अग्निवीरांची भरती (Agniveer Recruitment) केली जाणार आहे. ही पद भरती पुरुष (Male) आणि महिला (Female) दोन्ही उमेदवारांसाठी आहे. नौदलातील एसएसआर (SSR) पदासाठीची ही भरती असुन अर्ज (Application) करायचा असल्यास उमेदवार बारावी (HSC) उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. भरतीशी संबंधित माहिती भारतीय नौदलाच्या (Indian Navy) अधिकृत वेबसाईटवर (Website) मिळू शकणार आहे.
भारतीय नौदलातर्फे अग्निवीर पदासाठी एकूण 2 हजार 800 उमेदवारांची पदभरती करण्यात येणार आहे. यापैकी 560 पद महिलांसाठी आरक्षित ठेवले असुन 2240 पदांवर पुरुषांची पदभरती (Recruitment) करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रियेला 15 जुलैपासून सुरुवात झाली असुन आठवडाभर ही प्रक्रीया सुरु असणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार विज्ञान (Science) शाखेतील विद्यार्थी (Student) असणं अनिवार्य आहे. संबंधीत उमेदवार वर्ग बारावी उत्तीर्ण असुन रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र (Biology) किंवा कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) यापैकी कोणताही एक विषयाचा विद्यार्थी असणे अनिवार्य आहे. (हे ही वाचा:-National Pension System : सेवानिवृत्तीनंतर मिळवा महिन्याला दोन लाख रुपयांपर्यत खास पेंशन, जाणून घ्या काय नॅशनल पेंशन सिस्टीम)
अर्ज केलेल्या उमेदवारांची बारावीच्या गुणांनुसार निवड करण्यात येईल. निवडलेल्या उमेदवारांची लेखी (Written Test) आणि शारिरीक चाचणी (Physical Test) घेवून त्यानुसार उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म (Date Of Birth) 1 नोव्हेंबर 1999 ते 30 एप्रिल 2005 दरम्यान असल्यास तो उमेदवार पदभरतीसाठी पात्र असेल. संबंधीत पदभरतीचे अर्ज ऑनलाईन (Online) माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देवून सविस्तर माहिती मिळवू शकता.