Jet Airways Shutdown: तुम्ही Jet Airways ची तिकिटं बुक केली आहेत? त्याचा रिफंड कुठे मिळवाल?
जेट एअरवेज कडून तिकीट रिफंड प्रोसेस झाल्यानंतर 5-7 दिवसांनंतर पैसे क्रेडिट होणार आहेत.
कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या जेट एअरवेजला (Jet Airways)अखेर 17 एप्रिल दिवशी आपली विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. रात्री 10.20 वाजता जेटचं 9W-2502 हे अमृतसर ते मुंबई असे शेवटचे विमान आकाशात झेपावले आणि 25 वर्षांनतर ही सेवा बंद झाली. मात्र सध्या सुट्टयांच्या काळ सुरु आहे. अनेकांनी कित्येक महिन्यांआधीच त्यांचे व्हेकेशन प्लॅन्स आणि तिकिटं बूक केलेली असतात. अशावेळेस जर तुम्हीही आगाऊ बूक केलेल्या तिकिटांमध्ये जर जेट एअरवेजचं तिकीट असेल तर आता नेमकं काय कराल?
जेट एअरवेजकडून रिफंड मिळणार
जेट एअरने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांना लवकरात लवकर रिफंड दिला जाईल असे सांगितले आहे. त्यासाठी प्रवाशांना किमान 5-7 दिवस वाट पाहावी लागणार आहे. जेट एअरवेजच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना वेबसाईट, मोबाईल अँप यांच्याद्वारा तिकिटाचे रिफंड उपलब्ध करून दिले जाईल. तसेच एअरपोर्ट आणि सिटी तिकिटिंग ऑफिसमधून रिफंड मिळवता येऊ शकतो. अखेर Jet Airways ची सेवा बंद, काल रात्री घेतले शेवटच्या विमानाने उड्डाण; 10 मे रोजी होणार बोली प्रक्रियेवर निर्णय
ट्रॅव्हल एजंट आणि पोर्टल्स
जेट एअरवेजची तिकीट जर ट्रॅव्हल एजंट कडून काढली असेल तर रिफंड देखील तेथूनच मिळणार आहे. तसेच यात्रा, मेक माय ट्रिप यासारख्या ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल्स कडून तिकीट काढले असल्यास तुम्हांला संबंधित साईटवरूनच त्याचा रिफंड क्लेम करावा लागणार आहे.
Ministry of Civil Aviation ने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून प्रवाशांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात आहे. रिफंड देताना सर्व नियमांचं पालन केले जात आहे की नाही याची खातरजमा केली जात आहे. AirSewa पोर्टल आणि मोबाईल ऍप देखील अपग्रेड करण्यात आलं आहे. सध्या जेट एअरवेजची स्थानिक आणि परदेशी विमानसेवा ठप्प झाली आहे.