ITR Filing Deadline 2024: आयकर परतावा भरण्याची 31 जुलै ची डेडलाईन चुकली तर काय होणार परिणाम? भुर्दंड कितीचा ?
यंदाही टॅक्स भरताना अनेक तांत्रिक गोंधळ युजर्सना अनुभवावे लागले आहेत. यामध्ये Aadhaar-based OTP authentication, वेब पेज उशिराने लोड होणं, अपलोड एरर हे दिसत असले तरीही डेडलाईन वाढवण्याचा मानस आयकर विभागाचा अजूनही नाही.
आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत (ITR Filing Deadline) 31जुलै आहे. ही अंतिम मुदत आता जवळ येत आहे. त्यामुळे करदात्यांना लवकरात लवकर त्यांचे आयटीआर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे आयटीआर वेळेत भरणार नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे. Income Tax Department कडून अद्याप आयटीआर फाईल करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली नाही. सध्या मुदतवाढी बाबत अनेक चर्चा सुरू आहेत. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे चर्चा झाल्या पण मुदतवाढ देण्यात आलेली नाही. नक्की वाचा: How To File ITR: इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन कसा भरावा? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप पद्धत.
ITR deadline चुकली तर काय होणार?
- Old Tax Regime चुकली तर त्यांना अनेक फायदे गमवावे लागणार आहेत. यामध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुम्ही अंतिम मुदतीपूर्वी टॅक्स फाईल न केल्यास तुम्हांला आपोआपच New Tax Regime मध्ये शिफ्ट केले जाईल.
- नव्या टॅक्स रिजीम मध्ये जुन्या टॅक्स रिजीमचे फायदे मिळणार नाहीत त्यामुळे सहाजिक अधिक टॅक्स भरावा लागू शकतो.
- नवीन पद्धतीवर आल्याने टॅक्स अधिक वाढू शकतो आणि तुम्हाला थकीत कर रकमेवर व्याज देखील भरावे लागेल.
- जुन्या कर प्रणालीला प्राधान्य देणाऱ्यांवर सर्वात मोठा परिणाम होईल. आयटीआरची अंतिम मुदत चुकणे म्हणजे जुनी पद्धत निवडण्याचा पर्याय गमावणे, ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते. ही नवीन तरतूद आर्थिक वर्ष 23-24 ला लागू होते.
दंड किती रूपयाचा भरावा लागणार?
- Income Tax Act,च्या Section 234F अंतर्गत 5000 रूपयांचा दंड आहे. जर तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे तर दंड 1000 रूपये आहे.
- Section 234A, मध्ये तुमच्याकडून देय तारखेपासून थकबाकी असलेल्या कर रकमेवर दरमहा 1 टक्के दराने किंवा त्याचा काही भाग व्याज आकारला जाईल.
यंदाही टॅक्स भरताना अनेक तांत्रिक गोंधळ युजर्सना अनुभवावे लागले आहेत. यामध्ये Aadhaar-based OTP authentication, वेब पेज उशिराने लोड होणं, अपलोड एरर हे दिसत असले तरीही डेडलाईन वाढवण्याचा मानस आयकर विभागाचा अजूनही नाही. दरम्यान वेबसाईट वर मोठा टेक्निकल इश्यू झाला असेल तरच या डेडलाईन मध्ये वाढ केली जाऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)