
ITR Deadlines 2025: आयकर विभागाने 2024-25 (Income Tax Return) या कर निर्धारण वर्षाच्या अनुषंगाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी (ITR Filing FY 2024-25) आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. एकाच उत्पन्न स्रोत असलेल्या पगारदार व्यक्तींना ही प्रक्रिया सहजतेने करता येते, तर अनेक प्रवाहांमधून उत्पन्न असलेल्यांना ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची वाटू शकते. ज्या नागरिकांचे उत्पन्न एकापेक्षा अधिक उत्पन्न स्रोत आहेत, त्यांनी आयकर रिटर्न कसा भरावा. त्यासाठी आवश्यक माहिती, टीप्स आणि मार्गदर्शक (ITR Filing Guide) घ्या जाणून.
आवश्यक सर्व कागदपत्रे एकत्र करा
सर्वप्रथम, संबंधित कागदपत्रे एकत्र करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये पगाराच्या पावत्या, घरभाड्याचे करार, गुंतवणुकीची पावती आणि Form 26AS यांचा समावेश असतो. Form 26AS हे TDS (Tax Deducted at Source) आणि TCS (Tax Collected at Source) संदर्भातील माहिती सादर करते आणि यावरून वर्षभरात कापलेला कर तपासता येतो.
योग्य ITR फॉर्म निवडा
कागदपत्रे एकत्र केल्यानंतर योग्य ITR फॉर्म निवडणे आवश्यक आहे.
- ITR-3 हा व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी आहे.
- ITR-4 हा अंदाजे व्यवसाय उत्पन्नासाठी (Presumptive Income) निवडलेल्या करदात्यांसाठी आहे.
- योग्य फॉर्म निवडल्याशिवाय ITR प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
एकूण उत्पन्न आणि कराची गणना करा
प्रत्येक उत्पन्न स्त्रोतापासून मिळणाऱ्या रकमेची अचूक गणना करा. यात वेतन, भाडे, व्यवसायिक नफा, भांडवली नफा आणि व्याज यांचा समावेश असतो. सर्व स्त्रोतांचे मिळकती एकत्र करून एकूण करपात्र उत्पन्न ठरवा. लक्षात ठेवा, प्रत्येक उत्पन्न प्रकारावर कर लागू होण्याचे वेगवेगळे नियम आहेत.
कर सवलती आणि सूट यांचा लाभ घ्या
जास्तीत जास्त कर बचतीसाठी योग्य कर सवलती आणि सूट तपासा. यामध्ये Section 80C (गुंतवणूक), 80D (वैद्यकीय विमा), HRA (घरभाडे भत्ता) यांचा समावेश होतो. आपण जुना करप्रणाली किंवा नवी करप्रणाली निवडली आहे का, यावर सवलती अवलंबून असतात.
ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवली
ITR भरण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून आयकर विभागाने यावर्षी ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. याआधीची 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख आता 15 सप्टेंबर 2025 अशी करण्यात आली आहे.
ITR भरण्यासाठी महत्त्वाच्या अंतिम तारखा
- वैयक्तिक आणि नॉन-ऑडिट प्रकरणे: 15 सप्टेंबर 2025
- ऑडिट आवश्यक असलेले व्यवसाय/व्यावसायिक प्रकरणे: 31 ऑक्टोबर 2025
- ट्रान्सफर प्रायसिंगसाठी (Form 3CEB) आवश्यक प्रकरणे: 30 नोव्हेंब 2025
- Belated किंवा Revised रिटर्न सादर करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2025
ITR वेळेत न भरल्याचे परीणाम
जर तुम्ही अंतिम तारखेपूर्वी ITR भरले नाही, तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. जर तुमचे स्पष्टीकरण समाधानकारक नसेल, तर आर्थिक दंड किंवा काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे सर्व करदात्यांनी वेळेत आणि अचूक माहितीच्या आधारे आपला आयकर रिटर्न भरावा. अंतिम तारखेच्या अगोदर फाइलिंग केल्यास तांत्रिक अडथळे आणि दंड टाळता येईल.