Aadhaar Card Update: तुमचं आधारकार्ड काढून किती वर्ष झालेत? आधारकार्ड काढून दहा वर्ष पुर्ण झाल्यास आधारकार्ड अपडेट करणं अनिवार्य

यासंबंधीत विशेष सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

सध्या कुठल्याही छोट्यात छोट्या वा मोठ्या मोठ्या कामासाठी आधारकार्ड (Aadhaar Card) असणं अनिवार्य आहे. हल्ली प्रत्येकाकडे आपलं आधारकार्ड आहे. पण हे आधारकार्ड काढून किती वर्ष झालेत हे तुम्हाला आठवत का? साधरण २००९ ते २०१० च्या दरम्यान आधारकार्ड काढण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली. प्रत्येकाकडे आधारकार्ड असाव हे अनिवार्य (Aadhar Card Mandetory) झालं. अगदीच नवजात बाळापासून ते नव्वदी गाठलेल्या म्हाताऱ्यास देखील आधारकार्ड काढणं बंधनकारक केलं. पण तुम्ही तुमचं आधारकार्ड कधी काढलं होतं हे नेमक तुम्हाला आठवतयं का? कारण तुम्ही तुमचं आधारकार्ड २०१३ पूर्वी म्हणजेच १० वर्षापूर्वी काढलं असल्यास आता ते तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. यासंबंधीत विशेष सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद (Aurangabad) जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत खास आवाहन करण्यात आले आहे.

 

दहा वर्षाच्या कालावधीत बऱ्याच गोष्टीत बदल होतात. कुणाचा पत्ता (Address), कधी फोन नंबर (Mobile Number) किंवा एवढ्या वर्षात हाताचे ठसे (Finger Prints) बदलण्याची देखील संभावना असते. म्हणून ज्या आधारकार्ड वापरकर्त्यांच्या (Aadhaar Card) आधारकार्डास दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असेल त्यांच्याकडे आधारकार्ड असणं अनिवार्य आहे अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. (हे ही वाचा:- Aadhaar Card: आता जन्मताचं मिळणार बाळाचे आधारकार्ड, प्रशासनाचा मोठा निर्णय)

 

तरी नजीकच्या आधारकार्ड केंद्रास (Aadhar Card Centre) भेट देवून तुम्ही आवश्यक ते बदल तुमच्या आधारकार्डमध्ये करु शकता. कधी नावात चुक तर कधी जन्म तारखेत (Date Of Birth) बदल करायचा असल्यास हे बदल देखील तुम्ही तुमच्या आधार कार्डात (Aadhar Card) करु शकता.  हल्ली कुठल्याही वस्तूसाठी आधारकार्ड (Aadhar Card) असणं अनिवार्य असल्याने आधारकार्ड लवकरात लवकर अपडेट करुन घ्यावं अशा सुचना प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत.