Aadhar Card: नवीन मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये कसा अपडेट कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) जर बदलला असेल आणि तुम्हाला तो अपडेट करायचा असेल तर त्यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसूनही हे काम करू शकता. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया...

Aadhar Card (Photo Credits-Twitter)

आधार कार्ड (Aadhar Card) हे आजच्या काळात एक आवश्यक दस्तऐवज आहे. रेशन घेण्यापासून ते सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) जर बदलला असेल आणि तुम्हाला तो अपडेट करायचा असेल तर त्यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसूनही हे काम करू शकता. (Aadhar Card हरवले आहे? परत मिळविण्यासाठी UID किंवा EID क्रमांक कसा मिळवायचा? घ्या जाणून)

UIDAI ने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) सोबत एक विशेष करार केला आहे. या सेवेअंतर्गत आता तुम्ही तुमच्या घरी पोस्टमनला बोलवून आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक बदलू शकता. IPPB ची ही सुविधा त्यांच्या 650 शाखांमध्ये उपलब्ध असेल. या सेवेसाठी 146000 पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक उपलब्ध असतील. लवकरच या सेवेद्वारे मुलांचे आधार कार्डही बनवले जातील.

जाणून घेऊया प्रक्रिया:

# फोन नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार सुधारणा फॉर्म दिला जाईल. त्यात योग्य माहिती भरा.

# पूर्ण भरलेला फॉर्म अधिकाऱ्याला 25 रुपये शुल्कासह सब्मिट करा.

# फॉर्म सब्मिट केल्यानंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाईल. या स्लिपमध्ये अपडेट विनंती क्रमांक असेल. या विनंती क्रमांकासह, आपण नवीन मोबाईल क्रमांक आपल्या आधारशी जोडलेला आहे की नाही हे तपासू शकता.

# तुमचा आधार काही दिवसात नवीन मोबाईल क्रमांकाशी जोडला जाईल.

# जेव्हा तुमचा आधार नवीन मोबाईल क्रमांकाशी जोडला जाईल तेव्हा तुमच्या त्याच क्रमांकावर OTP येईल.

# त्या OTP चा वापर करून तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.

# तुम्ही UIDAI च्या टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करून नवीन मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्याची स्थिती देखील तपासू शकता.

आधार आणि पोस्ट ऑफिसच्या नवीन सुविधेद्वारे कोट्यवधी लोकांना त्यांचे मोबाईल क्रमांक अपडेट करण्यास फायदा होईल. त्याचबरोबर ज्यांचे आधार त्यांच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणीकृत नाही किंवा बंद करण्यात आले आहे, ते सहजपणे त्यांच्या आधार मधील मोबाईल क्रमांक अपडेट करू शकतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement