Update Aadhaar Address Online: घरबसल्या आधार कार्ड मध्ये पत्ता कसा अपडेट कराल?

आधार केंद्रावर जाऊन जसा फॉर्म भरून तुम्ही माहिती अपडेट करू शकता तशी आता पत्ता अपडेट करण्यासाठी विशेष ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Aadhar Card (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. सध्या मोबाईल क्रमांक,बॅंक खाते, पॅन कार्ड ते अगदी रेशन कार्ड पर्यंत आधार कार्ड जोडलं गेलं आहे. वास्तव्याचा पुरावा देण्यासाठी अनेक ठिकाणी आधार कार्ड पुरावा म्हणून स्वीकरलं जातं. परंतू तुमचा वास्तव्याचा पत्ता काही कारणास्तव सतत बदलत असेल तर तो वेळोवेळी आधार कार्डावर देखील बदलणं हे मोठं जिकरीचं काम आहे. परंतू सध्या ते ऑनलाईन अगदी झटपट करता येऊ शकतं. Aadhaar  Card वरील क्रमांक खरा की खोटा तपासून पाहण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा.  

आधार कार्ड हे बाबोमेट्रिक डाटाच्या आधारे बनवला जातो त्यासाठी पुन्हा पुन्हा अप्लाय करता येऊ शकत नाही. मात्र त्यामध्ये काही बदल करायचे असतील तर ती सोय आता ऑफलाईन आणि ऑनलाईन करता येऊ शकते. दरम्यान आधार केंद्रावर जाऊन जसा फॉर्म भरून तुम्ही माहिती अपडेट करू शकता तशी आता पत्ता अपडेट करण्यासाठी विशेष ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन पर्यायाने आधार कार्ड वरील पत्ता कसा अपडेट कराल?

तुमच्या अ‍ॅप्लिकेशनचं स्टेटस पाहण्यासाठी URN नंबर दिला जाईल तो नोंदवून ठेवा. सोबतच Acknowledgement कॉपी डाऊनलोड करून ठेवा. तुमच्या मेल आणि मोबाईल क्रमांकावर तुमच्या स्टेटसबद्दल माहिती अपडेट केली जाईल. जर अमान्य झाला तर त्याच्या कारणासह तुम्हांला नोटिफिकेशन पाठवलं जाईल. किमान 24-48 तासांमध्ये ऑनलाईन आधार कार्डवर पत्ता अपडेट होऊ शकतो. ते झाल्यानंतर तुम्ही नवं आधारकार्ड तात्काळ डाऊनलोड करू शकता. तसेच तुम्हांला पोस्टाच्या माध्यमातूनही आधारकार्ड पाठवले जाते.