Aadhaar-IRCTC Linking : महिन्याला 12 रेल्वे तिकीटं बूक करण्यासाठी IRCTC सोबत लिंक करा Aadhaar; पहा irctc.co.in वर ऑनलाईन कसे कराल लिंक?

6 पेक्षा अधिक तिकीटांसाठी आता प्रवाशांना आधार व्हेरिफाईड करावं लागणार आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

आता भारतातील कोरोना संकट आटोक्यात आल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे मागील दीड दोन वर्षांपासून घरात बंद असलेल्या अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. देशात विविध ठिकाणी भटकंती करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. मअग तुम्ही देखील आयआरसीटीसी द्वारा रेल्वे तिकीट बूक करत बाहेर पडण्याचा निर्णय घेत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. IRCTC ने आता पर्यटकांच्या सोयीसाठी महिन्याला 12 तिकीटं बूक करण्याची मुभा दिली आहे. पण या साठी त्यांना आधार नंबर सोबत स्वतःला व्हेरिफाय करून घेणं आवश्यक आहे.

IRCTC च्या माहितीनुसार महिन्याला 6 तिकीटं बूक करण्यासाठी तुम्हांला आधार व्हेरिफिकेशनची गरज नाही. 6 पेक्षा अधिक तिकीटांसाठी आता प्रवाशांना आधार व्हेरिफाईड करावं लागणार आहे. त्यासाठी आधार केवायसी ऑप्शन 'माय प्रोफाईल' वर असेल. तसेच 6 पेक्षा जास्त तिकीटं घेतलेल्यांपैकी किमान एकाचं अकाऊंट आधार व्हेरिफाईड करून घेणं बंधनकारक आहे. नक्की वाचा: Sleeping Pods: लवकरच IRCTC मुंबई सेंट्रल येथे सुरु करणार स्लीपिंग पॉड्स सेवा; जाणून घ्या कोण कोणत्या सुविधा मिळणार.

IRCTC User ID सोबत Aadhaar व्हेरिफाय कसा कराल?

आधार सोबत पॅसेंजर व्हेरिफाय कसा कराल?

दरम्यान ही प्रक्रिया महिन्याला 12 तिकीटांसाठीच  आहे. पूर्वीच्या नियमांनुसार 6 तिकीटांपर्यंत आधार व्हेरिफिकेशनची प्रवाशांना गरज्र नसेल.