COVID-19 Vaccine Certificate: कोविड 19 लसीचा डोस घेतल्यानंतर Aarogya Setu, CoWIN वरून वॅक्सिन सर्टिफिकेट्स डाऊनलोड कशी कराल?
याच्या द्वारा तुमच्या व्हॅक्सिन ची माहिती ठेवता येणार आहे.
भारतामध्ये सध्य कोविड 19 ची दुसरी लाट वेगाने पुढे सरकत असल्याने या मध्ये अनेकांच्या जीववर ती फार कमी वेळात बेतली. देशात या लाटेमुळे आरोग्य आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेकजण आता या लाटेमध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोविड 19 लस टोचून घेण्याकडे धावत आहेत. भारतामध्ये काल पर्यंत 17 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. जगातील या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमामध्ये 18 वर्षावरील सारेच सहभागी होत आहेत. तुमचं लसीकरण 2 डोस मध्ये पूर्ण होणार आहे. हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हांला एक कोविड 19 वॅक्सिन सर्टिफिकेट (COVID-19 Vaccine Certificate) दिलं जात आहे. तुम्हांला हे पहिल्या डोस नंतर दुसर्या डोस साठी किंवा महाराष्ट्रतून गोव्यात जाणार्या पर्यटकांना दाखवणं आवश्यक आहे. मग तुम्हांला हे सर्टिफिकेट ऑनलाईन कुठे मिळणार? हा प्रश्न पडला असेल तर खालील माहिती नक्की जाणून घ्या.
कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अपॉंईंटमेंट आवश्यक आहे. त्याचप्रामाणे तुम्हांला दिलेल्या लसीच्या डोसची माहिती देणारं कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट देखील कोविन अॅप, पोर्टल (CoWIN portal )आणि आरोग्य सेतू (Aarogya Setu app) वर उपलब्ध आहे. मग ते डाऊनलोड करून तुमचं लसीकरण झालं असल्याचा पुरावा म्हणून तुम्हांला वापरायचं झाल्यास पहा ते कसं डाऊनलोड कराल? (नक्की वाचा: कोविड-19 लसीसंदर्भातील गोंधळ टाळण्यासाठी CoWIN App वर security code चे नवे फिचर; पहा काय आहे खासियत).
CoWIN portal वरून डाऊनलोड कसं कराल?
cowin.gov.in या कोविनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Register/Sign In yourself वर क्लिक करा.
तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून साईन करा. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
तुमच्या पहिल्या आणि दुसर्या डोस नंतर तुमच्या नावाखाली एक टॅब दिसेल त्यामध्ये सर्टिफिकेट पाहता येईल.
येथूनच तुम्हांला कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट डाऊनलोड करता येऊ शकेल.
Aarogya Setu app वरून डाऊनलोड कसं कराल?
तुमच्या मोबाईल वर Aarogya Setu app ओपन करा.
होम स्क्रिन वर CoWIN tab वर क्लिक करा.
Vaccination Certificate option वर क्लिक करा.
तुमचा 13 अंकी beneficiary reference ID टाका, 'Get Certificate'वर क्लिक करा.
यानंतर तुम्हांला तुमचं कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट डाऊनलोड करता येईल.
कोविड 19 वॅक्सिन सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. याच्या द्वारा तुमच्या व्हॅक्सिन ची माहिती ठेवता येणार आहे. तुमचा पहिला पहिला डोस झाला असेल तर त्यावर डोसची माहिती, पुढील डोस कधी घ्यायचा याची माहिती अस्ते तर दुसर्या डोस मध्ये देखील तशीच माहिती दिलेली असते.