UPI Payment: इंटरनेट शिवाय करा युपीआय पेमेंट; 'ही' आहे सोपी पद्धत

अनेकदा युपीआय युजर्स इंटरनेट स्लो असल्याने पेमेंट करण्यास अडथळा निर्माण होतो.

UPI (Photo Credits-Facebook)

UPI Payment Offline Mode: तुम्हाला माहित आहे का? युपीआय पेमेंट (UPI Payment) करण्यासाठी नेहमी इंटरनेटची (Internet) आवश्यकता नसते. अनेकदा युपीआय युजर्स इंटरनेट स्लो असल्याने पेमेंट करण्यास अडथळा निर्माण होतो. परंतु, युपीआय पेमेंट करण्यासाठी ऑफलाईन मोड देखील आहे. युपीआय युजर्स *99# यूएसएसडी कोड (USSD Code) चा वापर करुन फोनच्या माध्यमातून ऑफलाईन पेमेंट देखील करु शकतात. मात्र *99# माध्यमातून मोबाईलवरुन युपीआय पेमेंट करण्यासाठी युजर्सचा मोबाईल नंबर (Mobile Number) बँक अकाऊंटशी (Bank Account) लिंक असणे गरजेचे आहे. (UPI Fraud: ऑनलाईन पेमेंट करताना सावधान! KYC, SIM आणि Bank च्या नावावर होऊ शकते फसवणूक)

ऑफलाईन UPI पेमेंट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

# तुमच्या मोबाईलवरुन *99# वर कॉल करा.

# त्यानंतर भाषा निवडण्याचा ऑप्शन देण्यात येईल. तिथे तुमच्या आवडीच्या भाषेची निवड करा.

# त्यानंतर काही पर्यायांसह एक मेनू दिसेल. मात्र आपल्याला केवळ पेमेंट करायचे आहे त्यामुळे पैसे पाठवण्यासठी 1 दाबा आणि सेंड करा.

# आता, ज्या पर्यायाद्वारे तुम्ही प्राप्तकर्त्याला यूपीआय पेमेंट करू इच्छिता ते निवडा. तुम्हाला मोबाईल नंबर वापरून करायचे असल्यास, पर्याय 1 निवडा.

# प्राप्तकर्त्याचे बँक खाते जोडलेला मोबाईल नंबर टाका.

# किती रक्कम पाठवायची आहे ते लिहा आणि सेंड करा. तुम्ही पेमेंटला रिमार्कही देऊ शकता.

# शेवटी तुम्हाला तुमचा युपीआय पिन टाकावा लागेल. त्यानंतर तुमचे ट्रान्जॅक्शन इंटरनेटशिवाय पूर्ण होईल.

विशेष म्हणजे तुम्ही *99# या पर्यायाचा वापर करुन युपीआय देखील डिसेबल (Disable) करु शकता. दरम्यान, NPCI ची USSD आधारित मोबाईल बँकिंग सेवा (*99#) नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू करण्यात आली होती.