Pension साठी Life Certificate ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्सचा वापर करा

प्रत्येक वर्षाला नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा जीवन प्रमाणपत्र जनरेट करता येते.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

पेन्शन (Pension)  धारकांना नियमित स्वरुपात पेन्शन मिळावी यासाठी लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate)  जीवन प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. प्रत्येक वर्षाला नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा जीवन प्रमाणपत्र जनरेट करता येते. पेन्शनधारकांना एक सॉफ्टवेअर अॅप आणि सुरक्षित आधार आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सिस्टिमचा वापर करुन डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करता येऊ शकते. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आवश्यक असल्यास पेन्शन धारकांना ती PDF च्या माध्यमातून एक्सेस करता येऊ शकते.

डिजिटल पद्धतीने प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पेन्शनधारकाकडे आधार कार्ड असणे अत्यावश्यक आहे. तसेच सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक आणि जन्मदाखला देऊन रजिस्टर करावे लागणार आहे. तर येथे अधिक जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने कसे मिळवाल जीनव प्रमाणपत्र.(Aadhaar Card सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक केलाय, हे शोधायचयं? uidai.gov.in वर फॉलो करा या स्टेप्स!)

>रजिस्ट्रेशन कसे कराल?

-प्रथम जीवन प्रमाणपत्र अॅप डाऊनलोड करावे.

-तेथे गेल्यानंतर नवे रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करावे.

-आधार क्रमांक. बँक अकाउंट नंबर, नाव, मोबाईल क्रमांक आणि PPO द्यावा.

-OTP Send ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मोबाईलवर येईल.

-ओटीपी मिळाल्यानंतर तो वेबसाइटवर टाका.

- आता Submmit ऑप्शनवर क्लिक करा. असे केल्यानंतर एक प्रमाणपत्र ID जनरेट होणार आहे.

(Banking Service: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता 1 नोव्हेंबर 2020 पासून पैसे जमा करणे व काढण्यासाठी भरावे लागेल शुल्क- Reports)

>>ऑनलाईन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट कसे जनरेट कराल?

-प्रमाण ID आणि OTP चा वापर करुन जीवन प्रमाण पत्र येथे जा.

-Generate Jeevan Paramaan ऑप्शन निवडून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक द्या.

-जनरेट OTP वर क्लिक करा.

-ओटीपी मिळाल्यानंतर तो तेथे टाका.

-PPO क्रमांक, नाव, पैसे देणाऱ्या कंपनीचे नाव सुद्धा द्यावे लागणार आहे.

-फिंगरप्रिंट स्कॅन करा आणि आधार डेटाचा वापर करुन प्रमाणित करा. जीनव प्रमाण स्क्रिन वर दिसेल. जीवन प्रमाण पत्र पूर्ण झाल्याचा एक मेसेज मोबाईलवर येईल.

तर वरील काही सोप्प्या स्टेप्स वापरुन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करु शकता. याचा खासकरुन फायदा वयोवृद्धांसह सद्यच्या घडीला कोरोनाच्या काळात अधिक होणार आहे.