एप्रिल 2019 पासून Home Loan चे व्याजदर बाजारभावानुसार ठरणार; RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढील चार महिन्यात कर्ज नियमांमध्ये बदल करण्याची सूचना आरबीआयने इतर बँकांना दिली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

गृहकर्जदारांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे. एप्रिल 2019 पासून गृहकर्जाचे (Home Loan) व्याजदर (Interest Rate) हे बाजारभावानुसार ठरवण्यात येणार असल्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) घेतला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यात कर्ज नियमांमध्ये बदल करण्याची सूचना आरबीआयने (RBI) इतर बँकांना दिली आहे.

रेपो रेट आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजाराभावानुसार ठरवण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. बाजारभाव वाढले की बँकांचे व्याजदर वाढतात. मात्र बाजारभावानुसार ते कमी होत नाहीत. त्यामुळे व्याजदर बाजारभावानुसार करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. या निर्णयामुळे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होईल. मुंबईमध्ये घर खरेदी महाग होणार ! Stamp duty मध्ये 1% वाढीचं विधेयक विधानसभेत मंजूर

सध्या फक्त सीटी बँक बाजारभावानुसार गृहकर्जाचे व्याजदर ठरवत आहे. त्यामुळे इतर बँकांना या निर्णय अंमलात आणण्यासाठी कर्जाच्या नियमांमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.