तुमच्या Aadhaar Card वरुन इतर कोणी SIM घेतले आहे का? 'या' पद्धतीने घ्या जाणून

यासोबतच सीम कार्डच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार, फॉर्डसही समोर आले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

How Many SIM Cards Are Registered Under Your Aadhaar Card: भारतातील स्मार्टफोनचे मार्केट विस्तृत आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच सीम कार्ड (SIM Card) च्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार, फॉर्डसही समोर आले आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेकदा गुन्हेगार इतर व्यक्तीच्या आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) वरुन जारी करण्यात आलेले सिम कार्ड्स वापरतात. अशा प्रकारचे फेक सिम कार्ड्स जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यावरुन तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिम रजिस्ट्रर आहेत, हे जाणून घेऊ शकतात. त्याचबरोबर अननोन आणि संशयास्पद नंबर तुम्ही अगदी सहज बंद करु शकता.

दूरसंचार विभागाने फसवणूक टाळण्यासाठी आणि युजर्सच्या सुरक्षेसाठी एक पोर्टल सुर केले आहे. tafcop.dgtelecom.gov.in अशी ही वेबसाईट असून यावर जावून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर रिजस्ट्रर सर्व फोन नंबर्स जाणून घेऊ शकता आणि नको असलेले नंबर्स बंदही करु शकता.

आधार कार्डवरुन जारी करण्यात आलेले मोबाईल नंबर्स असे पहा:

# सर्वप्रथम TAFCOP ची वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in ला भेट द्या.

# त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि आलेला ओटीपी द्या.

# यानंतर स्क्रीनवर तुमच्या नावाने रजिस्टर असलेले सर्व मोबाईल नंबर्स दिसतील.

# इथे तुम्ही अनावश्यक नंबर्स ब्लॉक करुन "रिपोर्ट" सबमिट करा.

#तुम्ही केलेल्या रिपोर्टचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला एक तिकीट आयडी देण्यात येईल.

तुम्ही जे नंबर्स सुरु ठेवायचे आहेत. त्यावर काहीही करण्याची गरज नाही. दरम्यान, ही सेवा अद्याप संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आलेली नाही. याबाबतचे काम विभागाकडून सुरु आहे. सरकारी नियमांनुसार, एका व्यक्तीला केवळ 9 मोबाईल नंबर्सही जारी करण्यात येतील.