Free Aadhaar Update: आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी येत्या 14 सप्टेंबरपर्यंत मुदत; नंतर भरावे लागेल शुल्क, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार अपडेटची मोफत सेवा केवळ MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.
Free Aadhaar Update: आजच्या काळात भारतामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card) हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. बँकेत खाते उघडणे असो, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेणे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, आधार आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार अपडेट करण्यासाठी वेळोवेळी मुदत निश्चित करते. सध्या UIDAI आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत देत आहे. मात्र, मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत या महिन्यात संपणार आहे. जर तुम्ही तुमचे आधार अपडेट केले नसेल, तर हे लगेच करा, कारण देय तारखेनंतर तुम्हाला या कामासाठी पैसे द्यावे लागतील.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मोफत आधार अपडेट करण्याची तारीख जाहीर केली आहे. यावेळी मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 केली आहे. याचा अर्थ तुम्ही तुमचे आधार 14 सप्टेंबरपर्यंत मोफत अपडेट करू शकता. यापूर्वी, UIDAI ने आपली अंतिम तारीख 14 मार्च व त्यानंतर 14 जून 2024 पर्यंत वाढवली होती. त्यानंतर ही तारीख त्यांनी पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. UIDAI ने तिसऱ्यांदा 2024 मध्ये आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख निश्चित केली आहे. या तारखेनंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे भरावे लागतील.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या अंतिम तारखेनंतर, 50 रुपये शुल्क भरावे लागेल. UIDAI द्वारे प्रदान केलेली आधार अपडेटची मोफत सेवा केवळ MyAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.
जाणून घ्या आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची प्रक्रिया-
- सर्वात आधी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/en/ वर जावे लागेल.
- तिथे माय आधार होमपेजवर जा. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTT टाकून लॉगिन करा.
- यानंतर तुमचा तपशील तपासा. खरे असल्यास बॉक्सवर खूण करा.
- ड्रॉप-डाउन मेनूमधून दस्तऐवज निवडा आणि माहिती चुकीची असल्यास अद्यतनित दस्तऐवज अपलोड करा.
- हे दस्तऐवज JPEG, PNG आणि PDF मध्ये अपलोड केले जाऊ शकते.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आवश्यक माहिती द्या.
- सर्व माहिती दिल्यानंतर तुमचे आधार अपडेट केले जाईल.