FCI Recruitment 2021: एफसीआय मध्ये नोकरीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रीया उद्यापासून सुरु; fci.gov.in वर कसा कराल अर्ज? जाणून घ्या

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एफसीआयने संस्थेच्या व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती सुरु केली आहे. उद्यापासून ही भरती प्रक्रीया सुरु होणार असून एफसीआयच्या अधिकृत वेबसाईट fci.gov.in वर तुम्ही पोस्टसाठी अर्ज करु शकता.

Representational Image (Photo Credit: File Image)

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Food Corporation of India) एफसीआयने संस्थेच्या व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती सुरु केली आहे. उद्यापासून ही भरती प्रक्रीया सुरु होणार असून एफसीआयच्या अधिकृत वेबसाईट fci.gov.in वर तुम्ही पोस्टसाठी अर्ज करु शकता. 89 पदांसाठी सुरु होणार असलेली ही भरती प्रक्रीया 30 मार्च 2021 पर्यंत असेल. निवड प्रक्रियेत ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश आहे. ऑनलाईन परीक्षेत अनारक्षित आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 50०% गुण तर अनुसूचित जाती, एसटी, ओबीसी आणि बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी 45% गुणांच्या निकषांवर मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी केली जाईल.दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा करावा? जाणून घेऊया...

FCI भरतीसाठी निवेदन करण्याची प्रक्रीया:

# एफसीआयच्या अधिकृत साईट recruitmentfci.in ला भेट द्या.

# होमपेजवर असलेल्या FCI भरती लिंकवर क्लिक करा.

# एक नवीन पेज ओपन होईल जिथे उमेदवारांना त्यांची नोंदणी करावी लागेल.

# अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.

# त्यानंतर फी भरा.

# Confirm वर क्लिक करुन ते पेज डाऊनलोड करा.

# तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याची प्रिंटही घेऊ शकता.

Name of the Post Number of Vacancies 
AGM Administration 30 Posts
AGM Technical 27 Posts
AGM Account 22 Posts
AGM Law 8 Posts
Medical Officer 2 Posts

सामान्य वर्ग आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवार निशुल्क अर्ज करु शकतात. यासाठी डेबिट कार्ड (रुपे / व्हिसा / मास्टरकार्ड / मास्ट्रो), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, आयएमपीएस, कॅश कार्ड / मोबाइल वॉलेट, यूपीआय हे पर्याय उपलब्ध आहेत. यासंबंधितची अधिक माहिती एफसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now