EPFO Pension Hike: पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; सेवानिवृत्ती वेतनात होणार घसघशीत वाढ, घ्या जाणून
जर तुमचा भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीएफ (EPFO ) कापला जात असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा. EPS (कर्मचारी पेन्शन योजना-1995) अंतर्गत वेतनधारक वर्गास मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ (EPFO Pension Hike) होण्याची शक्यता आहे.
खासगी कंपनीत नोकरदार असलेल्या कर्मचारऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचा भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीएफ (EPFO ) कापला जात असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा. EPS (कर्मचारी पेन्शन योजना-1995) अंतर्गत वेतनधारक वर्गास मिळणाऱ्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ (EPFO Pension Hike) होण्याची शक्यता आहे. किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी पाठिमागील प्रदीर्घ काळापासून होते आहे. दरम्यान, आता याबाबत नवी माहिती पुढे आली आहे. इपीएस अंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ व्हावी यासाठी ‘EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती’ने कामगार मंत्रालयाला एक 15 दिवसांचीनोटीस दिली आहे. या नोटीशीमध्ये किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्यात यावी असे म्हटले आहे.
कामगार मंत्रालयाने समितीची मागणी मान्य करावी अन्यथा देशव्यापी आंदोलन उभारण्यात येईल. जे सरकारला भविष्यात भारी पडेल असा इशाराच समितीने दिला आहे. EPS-95 (Employees Pension Scheme-1995 ) ही सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे चालवली जाते. जिचे सहा कोटींहून अधिक भागधारक आणि 75 लाख पेन्शनधारक लाभार्थी असल्याचे सांगितले जाते. (हेही वाचा, PF Balance Fraud: सावधान! तुम्ही तुमचं पीएफ अकाउंट बॅलेंन्स चेक करत आहात? १ लाख २३ हजारांच्या पीएफ अमाउंटवर सायबर चोरट्याचा डल्ला)
सोमवारी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात समितीने म्हटले आहे की, अत्यंत तुटपुंजी पेन्शन रक्कम आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे EPS-95 पेन्शनधारकांच्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे 15 दिवसांच्या आत किमान पेन्शनमध्ये वाढ न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा छेडण्यात येईल. रेल्वे आणि रस्ते रोखोसह आमरण उपोष असे आंदोलनाचे स्वरुप असेल. समितीने नियमित अंतराने घोषित केलेल्या महागाई भत्त्यासह किमान निवृत्ती वेतन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करण्याची मागणी केली आहे. समितीची मागणी मान्य होणार का? याबाबत उत्सुकता आहे.