Bank Holidays In March 2024: मार्चमध्ये एकूण 14 दिवस बँका राहणार बंद; वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

याशिवाय विविध झोनमध्ये इतरही अनेक सुट्ट्या आहेत. मार्च महिन्यात विविध झोनमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. मार्च 2024 मध्ये बँका कोणत्या तारखांना बंद राहतील याची यादी खालीलप्रमाणे...

Bank Holidays | Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holidays In March 2024: सध्याच्या आधुनिक युगात बँकिंगची बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. पण तरीही कर्ज घेण्यासारखी आणि इतर अनेक कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. पण जर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून बँकेच्या शाखेत गेलात आणि तुम्हाला बँक बंद असल्याचे आढळले तर तुमची खूप निराशा होऊ शकते. तुमची ही गैरसोय टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holidays List) घेऊन आलो आहोत. तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासूनचं बँकेच्या शाखेत जा, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते. याशिवाय विविध झोनमध्ये इतरही अनेक सुट्ट्या आहेत. मार्च महिन्यात विविध झोनमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. मार्च 2024 मध्ये बँका कोणत्या तारखांना बंद राहतील याची यादी खालीलप्रमाणे...

मार्च 2024 मधील सुट्ट्यांची यादी -

1 मार्च 2024: मिझोराममध्ये चापचर कुट सणानिमित्त बँका बंद राहतील.

3 मार्च 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

8 मार्च 2024: महाशिवरात्रीच्या निमित्ताने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू, उत्तर प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, शिमला या राज्यांमध्ये बँक सुट्टी असेल.

9 मार्च 2024: दुसरा शनिवार असल्यामुळे या दिवशी बँकेला सुट्टी असेल.

10 मार्च 2024: रविवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

17 मार्च 2024: रविवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

22 मार्च 2024: बिहार दिनानिमित्त बिहारमधील बँकांना सुट्टी असेल.

23 मार्च 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.

24 मार्च 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

25 मार्च 2024: होळीमुळे बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोहिमा, पणजी, श्रीनगर आणि केरळ झोन वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

26 मार्च 2024: होळीमुळे भुवनेश्वर, इंफाळ, पणजी येथे बँकांना सुट्टी असेल.

27 मार्च 2024: होळीमुळे बिहारमध्ये बँका बंद राहतील.

29 मार्च 2024: गुड फ्रायडेमुळे श्रीनगर, शिमला, जम्मू, जयपूर, गुवाहाटी आणि आगरतळा झोन वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

31 मार्च 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

दरम्यान, फेब्रुवारी 2024 मध्ये, बँका 10 दिवस बंद होत्या. काही सुट्ट्या काही राज्ये किंवा प्रदेशांसाठी विशिष्ट असतात. फेब्रुवारी 2024 मध्ये, निवडक राज्यात लोसार, बसंता पंचमी/सरस्वती पूजा, लुई-नगाई-नी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्य दिन/राज्य दिवसानिमित्त बँकांना सुट्टी होती. बँकांच्या सुट्ट्यांमध्ये राज्यानुसार बदल असू शकतो.